चोरीला गेलेल्या मोबाईलचा लावला शोध
मुंबई : विमानतळावर जाण्यासाठी कार बुक करत असताना महिलेच्या हातातू मोबाईल खेचून नेणाऱ्याला अवघ्या काही तासांमध्ये अटक करण्यात आली. ही कारवाई मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी केली. मोबाईलचा शोध लावल्याने समाधानी झालेल्या रशियन महिलेने मुंबई पोलिसांचे आभार मानले.
अशी केली चोरी…
निना दिमित्रीगेमनेको (वय ३७) ही १२डिसेंबर २०२३ रोजी २.२० च्या सुमारास साकीनाका परिसरातल्या चौधरी बंक्वेट हॉल येथील रस्त्यावर उभे राहुन मुंबई विमानतळावर जाण्याकरिता कार बुक करीत होती. त्यावेळी तेथे आलेल्या एका चोराने तिच्या हातातील मोबाईल खेचून पळून गेला. अचानक घडलेल्या प्रसंगातून स्वत:ला सावरत निनाने पोलीस ठाणे गाठले. घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला. या प्रकरणी (गु.र.क्र. ११५२/२०२३) भादंवि कलम ३९२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
अन् आरोपीला ठोकल्या बेड्या
सदर गुन्हयातील आरोपी आणि जबरीने चोरी केलेली मालमत्ता यांचा शोध लावण्याकरीता तपासी अधिकारी सपोनि कोरे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदारांनी घटनेचे गांर्भीय ओळखुन तांत्रिक माहितीद्वारे तपास सुरू केला. तपासादरम्यान हाती लागलेल्या माहितीद्वारे अजय पांडू साबळे (वय २०) याला बेड्या ठोकण्यात आल्या व त्याने चोरलला ७० हजारांचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला.
यांनी केला तपास
सदरची यशस्वी कामगीरी मापोलीस सह आयुक्त (का व सु) श्रीसत्यनारायण चौधरी, माअपर पोलीस आयुक्त श्री. परमजीत सिंह दहिया ( पश्चिम प्रादेशिक विभाग), मापोलीस उप आयुक्त श्री. दत्ता नलावडे (परिमंडळ-१०, मुंबई), मा. सहायक पोलीस आयुक्त श्री भरतकुमार सुर्यवंशी (साकीनाका विभाग), यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.गभाजी चिमटे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) योगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि वाल्मीक कॉरे, हवालदार कोकणे, कांगीणकर, खैरमोडे, भुवड, अंमलदार बंगाळे व राहुल जाधव यांनी केली.