police varata

Woman arrested for robbing train passengers

प्रवाशांना लुटणारी सराईत महिला जेरबंद;
११ गुन्हे दाखल असलेल्या महिलेकडून ३ लाखांचा ऐवज जप्त

मुंबई : प्रवासी महिलांना लुटणाऱ्या सराईत आरोपी महिलेला जेरबंद करण्यात आले. ही कारवाई मुंबई लोहमार्ग गुन्हे शाखेच्या विशेष कृती दल पथकाने केली. ही महिला सराईत आरोपी असून तिच्यावर ११ गुन्हे दाखल आहेत. तिच्याकडून ३ लाख ८ हजार ३४३ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

  Kalyan Railway Station
राजेश्वरी राजेंद्र पाटील (50) यी कुर्ला रेल्वे स्थानकातील फलाट क्र.1 वर आलेल्या कल्याण लोकलच्या महिलांच्या राखीव डब्यातुन प्रवास करत होत्या. त्या घाटकोपर स्थानकात उतरल्या. दरम्यान त्यांच्या हातामध्ये असलेल्या पर्समधील ३ लाख ८ हजार ३४३ रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याच्या (गु.र.क्र. 1709/2024, कलम 303 (2) BNS अन्वये) गुन्हा नोंद करण्यात आला.
 या गुन्ह्याच्या तपासादरम्यान हाती लागलेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे कविता अरुण कटके (४५) हिला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान तिच्या दिवा येथील घरातून चोरलेला मुद्दमाल जप्त करण्यात आला. 

जप्त केलेला सोन्याचा ऐवज

Kalyan Railway Station

kalyan police

विविध रेल्वे पोलीस ठाण्यांत दाखल गुन्हे

1) दादर – गु.र.क्र. 50/2012 कलम 379 IPC

2) कुर्ला – गु.नों.क्र. 239/2012 कलम 392 भादंवि

3) वांद्रे – गु.र.क्र. 26/2015 कलम 379 IPC

4) कल्याण – गु.र.क्र 168/2015 कलम 379 IPC

5) बोरिवली – गु.र.क्र 200/2014 कलम 392 IPC

6) डोंबिवली – गु.र.क्र 17/2015 कलम 379 भादंवि

7) अंधेरी – गु.र.क्र. 88/2014 कलम 379 IPC

8) ठाणे – गु.र.क्र 43/2016 कलम 379 भादंवि

9) कुर्ला – गु.र.क्र 411/2016 कलम 379 भादंवि

10) वसई रोड – गु.र.क्र 848/2023 कलम 379 भादंवि

11) वसई रोड – गु.र.क्र 886/2023 कलम 379 भादंवि

ही कारवाई मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, लोहमार्ग मध्य परिमंडळचे उपायुक्त मनोज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र रानमाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर, पोलीस निरीक्षक रोहित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत भुपेंद्र टेलर, सपोउपनि कृष्णराव चव्हाण, रविंद्र दरेकर, मिनाक्षी गोहिल, हवालदार वृषाली मयेकर, प्रविणसिंग घार्गे, सुनिल कुभांर, विकास नलगे, वैभव शिंदे, विकास रासकर, जयेश थोरात, सतिश फडके, गणेश महागावकर, पदमा केजळे, पोलीस नाईक मिलिंद पाटील, मयुर पाटील, अंमलदार गोरख सुरवसे, सुनिल मागाडे यांनी केली आहे. तसेच तपासात तांत्रिक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश खाडे, पोलीस नाईक विक्रम चावरेकर, अमोल अहिनवे यांचेही मोलाचा सहभाग लाभला.

👇 खालील बातमीही वाचा👇

चेन स्नॅचिंगच्या १८ गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!