श्री. विवेक फणसळकर,
मुंबई पोलीस आयुक्त
जय हिंद सर,
काही दिवसांपूर्वी नेहमीप्रमाणे मुंबई पोलीस अंमलदार व अधिकाऱ्यांचा सेवानिवृत्तीचा समारंभ झाला. मात्र यंदाचा सेवानिवृत्तीचा सोहळा पोलीस पत्नीने व्यक्त केलेल्या भावनांमुळे उल्लेखनीय ठरला. त्यांनी अनेक गोष्टी अधोरेखित केल्या. याचे जोरदार कौतुक झाले. या पोलीस पत्नीप्रमाणे अनेक आहेत त्यांना आपल्या घरातील पोलिसांची कायम चिंता असते.
काही दिवसांपूर्वी अनेक पोलिसांनी वैद्यकीय कारणास्तव घराजळील पोलीस ठाण्यात बदली करण्यासाठी विनंती केली. त्यांच्या विनंतीवर वरिष्ठांनी होकारार्थी शेराही दिला. पण अद्याप त्यांच्या बदलीची नोटीस जारी झालेली नाही. वरिष्ठांनी होकार देऊनही का बदली होत नाही? हा प्रश्न सर्वांच्याच मनाला घोर लावत आहे.
आधीच वैद्यकीय कारणामुळे त्रस्त त्यात कर्तव्यासाठी घरापासून दूर जावे लागत असल्याने पोलीस कुटुंबियातील सर्वच चिंतेत असतात.
साहेब, तुम्ही कायम मुंबई पोलीस दलाला कुटुंबियांसमान वागणूक देत असतात. आपल्याच कुटुंबातील काही पोलीस त्रस्त आहेत, त्यामुळे आजारी पोलिसांना घराशेजारी बदली मिळण्यासाठी आपण प्रयत्न करावे, ही विनंती!
आपला विश्वासू,
पोलीस कुटुंबिय