Site icon police varta

Water Man Dr. Rajendra Singh

जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंग यांना निसर्गप्रेमी खाकीतले सुमित राठोड यांच्याकडून वृक्ष भेट

वर्धा : १९ जानेवारी रोजी पर्यावरण संवर्धन संस्था हिंगणघाट जिल्हा वर्धा यांच्याकडून विदर्भस्तरीय पहिले वृक्ष संमेलन हेंमतवन सागरबाग येथे पार पडले. या संमेलनाचे अध्यक्ष भारताचे जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंग व पर्यावरणवादी पत्रकार अतुल देऊळगावकर यांना खाकीतले निसर्गप्रेमी सुमित राठोड यानी वृक्ष भेट दिले.


या प्रसंगी डॉ राजेन्द्र सिंग यांनी जल बचाव व पर्यावरण बचाव या विषयावर सविस्तर माहिती दिली. सोबतच पर्यावरणादी पत्रकार लेखक म्हणुन ओळख असलेले अतुल देऊळगावकर यांनीही पर्यावरणावर आधारित माहिती दिली.
पोलीस अंमलदार सुमित राठोड यांनी पर्यावरण संवर्धन संस्थेचे (हिंगणघाट जिल्हा वर्धा) अध्यक्ष आशीष भोयर यांचे आभार व्यक्त केले.

Exit mobile version