Poet in Maharashtra Police Force
कवी – मिठ्ठु सदू जाधव,महाराष्ट्र पोलीस,रा.रा.पो.बल गट क्र.14,छत्रपती संभाजीनगर वारकरी अनवाणी पायी | चालत ही वारी |विठ्ठलाच्या दारी | वारकरी || धृ || विठ्ठलाचे जप | पांडुरंग हरी |आहे ओठावरी | तयामुखी || १ || पंढरीला जातो | वळणाचा वाट |अवघड घाट | पायीचाले || २ || व्याकुळ हा जीव | पांडुरंगा साठी |चंद्रभागे काठी…