Site icon police varta

मुंबई, ठाण्यात गांजा, पिस्तूल बाळगणारे दोन अटकेत । Two arrested for possessing ganja, pistol in Mumbai, Thane

मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा ७ ची कारवाई

मुंबई : मुंबईत २ पिस्तूल, ६ काडतूस, गांजा बाळगणाऱ्या दोन जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ही कारवाई मुंबई व ठाण्यामध्ये मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा ७ च्या पथकाने केली. या कारवाईत एकूण १६ लाख ४९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

१७ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १४.१५ वाजण्याच्या सुमारास भांडुप परिसरातील भवानी नगर येथील एका घरात राहणारा व्यक्तीकडे पिस्तूल असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट ७ च्या पथकाने त्या ठिकाणी सापळा लावला आणि त्या व्यक्तीला पिस्तूल व एका जिवंत काडतुसासह ताब्यात घेतले.

कांजुर मार्ग पोलिसात गुन्हा दाखल

शस्त्रबंदीचे उल्लंघन केल्या प्रकरणी त्या व्यक्तीविरोधात कांजुर मार्ग पोलिसांनी गु.र.क्र. २१५/२०२४ कलम ३,२५ भा. ह. का. सह ३७ (१) (अ), १३५ म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या आदेशान्वये गु.प्र.शा., वि.स्था.गु.र.क्र. ६६/२०२४ अन्वये कक्ष-७, गु.प्र.शा., गु.अ.वि., घाटकोपर, मुंबई या कक्षाकडे देण्यात आला.

मुंबई पोलीस ठाण्यात…

चौकशीदरम्यान सदर पिस्तूल त्याने ठाण्यातील माजीवाडा, येथील एका इसमाकडून घेतल्याचे सांगितले. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ठाण्यातील माजीवाडा परिसरातील रूस्तमजी अयेना बिल्डींग जवळ, साईनाथ नगर येथून पिस्तूल विकणाऱ्याला ताब्यात घेतले. हा आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात भांडुप, मुलुंड, ठाणे परिसरात गांजा विक्री प्रकरणी गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान या व्यक्तीकडूनही देशी बनावटीचे पिस्तुल व ६ जिवंत काडतुसे, ३८.७ किलो गांजा जप्त करण्यात आला.

सदरची कारवाई मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहयोगी पोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) शशीकुमार मिना, पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण-1) विशाल ठाकूर, सहायक पोलीस आयुक्त (डी-पूर्व) चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत, पोलीस निरीक्षक राजश्री बालगी, एस.पी.एन. धनाजी साठे, अंमलदार महेश शेलार, नामदेव परबळकर, हवालदार दीपक पवार, संतोष गुरूव, सुभाष मोरे, शशिकांत कांबळे, गिरीश जोशी, विनोद शिरापुरी, सचिन गलांडे, प्रमोद जाधव, सिमा तिरोडकर, विलास राऊत, प्रमोद शिंदे, जितेंद्र पाटील, संतोष धुमाळ, राजाराम कदम, दिलिपराव राठोड यांनी केली.

Exit mobile version