मुंबई अमलीपदार्थविरोधी पथकांचा कारवायांचा धडाका
* ‘हेरॉईन’ची तस्करी करणाऱ्या यूपी, उतराखंडच्या चौघांना अटक
* कांदिवली युनिटन जप्ते केले २.३७ कोटीचे ड्रग्ज
Police varta
मुंबई : मुंबई पोलिसांनी अमलीपदार्थविरोधी पथकाने कारवायांचा धडाका लावला असून कांदिवली युनिटने २ कोटी ३७ लाख ६० हजारांचे हेरॉईन जप्त केले. या कारवाई यूपी, उतराखंडच्या चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या.
अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखेतील कांदिवली युनिटचे पथक ९ नोव्हेंबर २०२४ रोजी मालवणी-मालाड परिसरात गस्त घालत असताना चार संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे २ कोटी ३७ लाख ६० हजार रुपयांचे ५९४ ग्रॅम ‘हेरॉईन’ आढले. या प्रकरणी कांदिवली युनिटने (गुन्हा रजि.क्र. ६८/२०२४) कलम ८ (क) सह २१ (क), २९ एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशि कुमार मीना, अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे उपायुक्त शाम घुगे, एसीपी सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैभव धुमाळ, सपोनि विजय नाईक व पथकाने केली.