Site icon police varta

Three generations of embezzlers from Bangladesh exposedTwo grandchildren born in Mumbai

घुसखोरी करणाऱ्या बागलादेशींच्या तीन पिढ्यांचा पर्दाफाश,
दोन नातवांचा भारतात जन्म

मुंबई : बांगलादेशी (Bangladesh) आजाेबांनी अनेक वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी करून संसार थाटला. मुंबईसह भारतात ठिकठिकाणी राहिले. यादरम्यान दोन नातवांचाही जन्म झाला. दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांतील तीन पिढ्यांचा पर्दाफाश करण्यात ट्रॉम्बे पोलिसांना यश आले आहे.


सैल अली खानवरील हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी बांगलादेशींवर कारवायांचा सपाटा लावला आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करत ट्रॉम्बे पोलिसांनी शाहरुख शहदात बेपरी ऊर्फ शेख (22), इम्रान शहदात बेपारी (35, दोन्ही रा.ठी.गल्ली क्रमांक 1,भीमनगर, महारष्ट्रनगर, मानखुर्द, मुंबई , मूळ गाव : जिनैधा, ढाका,राज्य खुलना विभाग, बांगलादेश) यांना अटक करण्यात आली. यांचे आजोबा व वडील भारतात आले होते, अशी माहिती तपास करणाऱ्या पोलीस पथकाने दिली. या प्रकरणी (गु.र.क्र.20/2025(वि. स्थां. क्र.08/2025)* कलम नियम 03 सहकलम 6 पारपत्र (भारतात प्रवेश )1950,परिच्छेद 3(1) परकीय नागरीक आदेश 1948 सहकलम 14 परकीय नागरीक कायदा 1946 ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या सर्वांचे पासपोर्ट, मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.


दुसऱ्या एका गुन्ह्यात अजहर उर्फ आझाद नूर इस्लाम शेख (वय 24, जत्राबारी थानाः- जत्राबारी जिल्हा – ढाका विभाग – ढाका देश, बांगलादेश) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी (गु.र.क्र.07/2025 कलम नियम 03 सहकलम 6 पारपत्र (भारतात प्रवेश )1950,परिच्छेद 3(1) परकीय नागरीक आदेश 1948 सहकलम 14 परकीय नागरीक कायदा 1946) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीची पत्नी व सासू भारतीय असून मूळचे कोलकात्याचे आहेत. याचे लग्न सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

कारवाई करणारे पथक

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गंगाराम वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली एटीसीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल लोंढे, हवालदार आखाडे, अंमलदार सकट, बाड
महिला अंमलदार सोनवले यांनी केली.

खालील बातमीही वाचा👇

👉ईमो अॅपद्वारे बांगलादेशात फोनाफोनी

Exit mobile version