police varata

Thefts in mail, express

मेल/एक्सप्रेसमध्ये चोरी करणारा गजाआड
1.74 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाची मोठी कामगिरी

ठाणे : मेल एक्सप्रेस गाड्यांमधील एसी बोगींमध्ये चोरी करणाऱ्या आरोपीस ठाणे गुन्हे शाखा, लोहमार्ग मुंबईच्या युनिट क्र. 2 च्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. या प्रकरणात एकूण 1,74,800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून तीन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.

30 ऑक्टोबर 2024 रोजी फिर्यादी सिद्धेश साबाजी दौंड (33, गोवा) यांचा लॅपटॉप आणि मोबाईल फोन दिवा रेल्वे स्टेशनच्या हद्दीतून चोरीला गेला होता. या संदर्भात ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. अशा प्रकारच्या गुन्ह्यांची गंभीर नोंद घेत, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी गुन्हे शाखेला तपासासाठी विशेष आदेश दिले. त्यानुसार तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे अनंत ज्ञानेश्वर घोरपडे (24, कोच अटेंडंट) याला 25 नोव्हेंबर 2024 रोजी अटक करण्यात आली. त्याने गुन्ह्याची कबुली देत अन्य दोन चोरीच्या प्रकरणांमध्ये सामील असल्याचे उघडकीस आले.

मुद्देमाल हस्तगत

  1. ठाणे रेल्वे पोलीस ठाणे: 70,000 रुपयांचा डेल लॅपटॉप आणि 30,000 रुपयांचा अॅपल मोबाईल फोन
  2. कल्याण रेल्वे पोलीस ठाणे: 1,40,000 रुपयांची 20 ग्रॅम सोन्याची साखळी
  3. कोकण रेल्वे पोलीस ठाणे: 54,800 रुपयांचा लिनोवो लॅपटॉप
    एकूण हस्तगत मुद्देमाल: 2,94,800 रुपये

कारवाईत सहभागी अधिकारी

मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त मनोज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र रानमाळे यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर यांच्या मार्गदर्शन व सुचनांनुसार पोउपनिरी/अशोक होळकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन शेडगे, रविंद्र दरेकर, संदीप गायकवाड, हवालदार सपना शिंदे, तुकाराम दळवी, सतीश धायगुडे, अनिल खाडे, अमित बडेकर, शशिकांत कुंभार, इम्रान शेख, अंमलदार हरिश संदानशिव, सुनिल मागाडे तसेच सपोनि / मंगेश खाडे व अमोल अहिनवे (तांत्रिक शाखा) यांनी केली आहे.

रेल्वे पोलिसांचे आवाहन

रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही कारवाई महत्त्वपूर्ण ठरली असून लोहमार्ग पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचे सिद्ध झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!