Site icon police varta

The person who called that there will be a bomb explosion in Mumbai, Pune, Sangli, Satara, Solapur was arrested

मुंबई, पुणे, सांगली, सातारा, सोलापुरात बॉम्ब स्फोट होणार असल्याचा कॉल करणारा गजाआड
मुंबई लोहमार्ग गुन्हे शाखेची कौतुकास्पद कारवाई

मुंबई : ऐन लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू असताना सांगलीसह मुंबई, पुणे, सातारा, सोलापुरात बॉम्ब स्फोट होणार असल्याचा कॉल करून खळबळ उडवून देणाऱ्याला गजाआड करण्यात (The person who called that there will be a bomb explosion in Mumbai, Pune, Sangli, Satara, Solapur was arrested) आले. ही उल्लेखनिय कारवाई मुंबई लोहमार्ग गुन्हे शाखेच्या पथकाने (Mumbai Railway Crime Branch) केली. तपासासाठी आरोपीला सांगली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बॉम्ब स्फोटाच्या कॉलमुळे संपूर्ण महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) सतर्क झाले. मुंबई लोहमार्ग गुन्हे शाखेची पथकेही आरोपीचा शोध घेऊ लागले. तपासादरम्यान गुन्हे शाखा लोहमार्गच्या विशेष कृती दलाच्या पथकाला तांत्रिक व गुप्त बातमीदाराच्या आधारे आरोपी सचिन मारुती शिंदे उर्फ माधव किसन भिसे (वय 35, रा. शिंदे मळा, तरडगाव, ता. फलटण, जि. सातारा) याची माहिती समजली. त्यानुसार त्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकातून (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Railway Station) ताब्यात घेतले. या आरोपीने पुणे, सांगली व मुंबई शहर पोलीस नियंत्रण कक्ष (Mumbai City Police Control Room) येथे फोन करून बॉम्बस्फोट होणार असल्याबाबत खोटी माहिती दिल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने ( गु. र. नं -318/24 कलम- 177, 182, 505(1)(ब),507) सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण व पथकाने आरोपीचा ताबा घेतला आहे.

The investigating police team। तपास करणारे पोलीस पथक…

ही कारवाई मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशुद्दीन शेख, पोनि/रोहीत सावंत याचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिपक शिंदे, सपोउपनि चव्हाण, हवालदार घार्गे, साळवी, नलगे, थोरात, फडके, दिघे, महिला हवालदार मयेकर, अंमलदार पाटील, मयूर पाटील यांनी केली.

Exit mobile version