साताऱ्यात देशी पिस्टलसह आरोपी अटकेत
गुन्हेगारीविरोधातील आणखी एक यशस्वी मोहीम!
उदय आठल्ये
सातारा : सातारा पोलीस दलाने बेकायदेशीर शस्त्र तस्करीविरोधात मोठी कारवाई करत मसूर येथे देशी बनावटीची पिस्टल व जिवंत काडतूस जप्त केले. स्थानिक गुन्हे शाखा आणि मसूर पोलीस ठाण्याच्या संयुक्त मोहिमेत एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. या उत्कृष्ट कारवाईबद्दल अधिकारी व अंमलदार यांचे समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा व श्री. अतुल सबनीस, पोलीस उप-अधीक्षक, (गृह) सातारा यांनी अभिनंदन केले.
गुप्त माहितीवरून अचूक कारवाई
पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मसूर-शामगाव मार्गावर एका व्यक्तीकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली. यावर तातडीने पथक तयार करून स.पो.नि. सुधीर पाटील यांच्या नेतृत्वात मसूर येथे १६ डिसेंबर २०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेने
सापळा रचून संशयित व्यक्तीला अटक करून देशी बनावटीची पिस्टल, १ जिवंत काडतूस, आणि हिरो एच एफ डिलक्स मोटारसायकल असा एकूण ₹१.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरुद्ध शस्त्रबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आतापर्यंत १०४ बंदुका जप्त
सातारा पोलीस दलाने नोव्हेंबर २०२२ पासून आतापर्यंत १०४ देशी बनावटीच्या पिस्टल, ४ बारा बोअर बंदुका, २ रायफल, २३१ जिवंत काडतुसे, ३८३ रिकाम्या पुंगळ्या, आणि ४ मॅग्झिन जप्त करून मोठे यश मिळवले आहे.
कारवाईत सहभागी असलेले पोलीस पथक
ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फाणे, पोलील उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर अंमलदार सचिन साळुंखे, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, लक्ष्मण जगधने, हसन तडवी, सनी आवटे, मुनिर मुल्ला, अमित झेंडे, अजय जाधव, राजू कांबळे, मनोज जाधव, धिरज महाडीक, अमृत कर्पे, वैभव सावंत आणि मसुर पोलीस ठाण्याचे सपोनि आदिनाथ खरात, अंमलदार, महेश लावंड, अमोल पवार, महेश घुटूगडे, विक्रम पोतेकर, यांनी सहभाग घेतला.
साताऱ्यातील कायदा-सुव्यवस्थेला बळकटी
सातारा पोलीस दलाच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीला मोठा फटका बसला आहे. शस्त्रसाठा जप्तीच्या मालिकेने सातारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेला अधिक बळकट करण्यास मदत झाली आहे.