Site icon police varta

safety of Palghar district residents

पालघर जिल्हावासीयांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा ‘जनसंवाद’

भीमराव काळे
पालघर : सध्याच्या काळात वाढते अपघात, ऑनलाईन लूट यांसह बालविवाह, लैंगिक अत्याचार यांसह अन्य गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी पालघर जिल्हा पोलिसांनी जनसंवाद २०२५ हे अभियान राबविले आहे. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या सॉकल्पनेतून २२ जानेवारी रोजी विक्रमगड येथील स्वासतिक पेट्रोलपंपसमोरील भानुशाली मैदान येथे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमाला कोकण पोलीस परिक्षेत्रचे विशेष संजय दराडे उपस्थित राहणार आहेत. यावेळी नागरिकांच्या सुरक्षेचा संदेश देण्यासाठी यूट्यूबवरील स्टार कलाकार आपल्या विशेष शैलीत देणार आहेत. तसेच विक्रमगड पोलीस ठाण्यातर्फे रस्ते सुरक्षा अंतर्गत नागरिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

कार्यक्रमाला गणपत पिंगळे (उप विभा. पोलीस अधिकारी, जव्हार विभाग), विनायक नरळे (अपर पोलीस अधीक्षक, पालघर), रविंद्र पारखे (सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी विक्रमगड पोलस ठाणे), सुरेश साळुंखे (सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी वाहतुक शाखा, पालघर) व अन्य अधिकारी, अंमलदार उपस्थित राहणार आहेत. आपले जीवन सुरक्षित राहण्यासाठी कार्यक्रमात सहभागी होऊन सुरक्षेचा मूलमंत्र जाणून घ्या, असे आवाहन पालघर जिल्हा पोलिसांनी केले आहे.

Exit mobile version