पिस्तूल विकण्यास आलेली टोळी जेरबंद;
👉२ पिस्तूलसह ३ काडतूस जप्त,
👉पोलीस निरीक्षक अरुण देवकर, राजू ताशिलदार यांची उल्लेखनिय कामगिरी
✒️ उदय आठल्ये
सातारा : पिस्तूल विकण्यास आलेल्या टोळीला जेरबंद करण्यात आले. ही उल्लेखनिय कारवाई पोलीस निरीक्षक अरुण देवकर, राजू ताशिलदार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा व कराड शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. या कारवाईत २ पिस्तूल, ३ काडतूस असा एकूण १ लाख ६० रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी सातारा जिल्ह्यामध्ये बेकायदा विनापरवाना शस्त्र बाळगणारे व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली. या अंतर्गत आरोपींचा शोध सुरू असताना पिस्तूल विकणाऱ्यांची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार २८ जानेवारी २०२५ रोजी गुन्हे शाखा व कराड शहर पोलिसांनी कार्वेनाका ते गोळेश्वर परिसरात सापळा लावून आकाश हिंदुराव चव्हाण (वय २७ वर्षे रा. कार्वे नाका कराड), तेजस भाऊ गुरव (वय २४ वर्षे रा. हजारमाची कराड), जय लहुराज कणसेवय (२० वर्षे रा.नवी पेठ मायणी तामाण) यांच्या मुसक्या आवळल्या. चौकशीदरम्यान अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे दोन पिस्टल व तीन जीवंत काडतुसे आढळले. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात ( गुन्हा रजिस्टर नंबर ८९/२०२५) भारतीय हत्यार अधिनियम ३, २५ भारतीय न्याय संहिता कलम १११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा अमोल ठाकूर, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार कराड शहर पोलीस स्टेशन, सपोनि दत्तात्रय दराडे, सपोनि रोहित फार्णे स्थागुशा सातारा, सपोनि अशोक भापकर, कराड शहर पोलीस स्टेशन, पोउनि विश्वास शिंगाडे, पारितोष दातीर स्थागुशा सातारा, कृष्णा डिसले, कराड शहर पोलीस स्टेशन, स्थागुशाचे पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, लैलेश फडतरे, लक्ष्मण ज गधने, प्रविण फडतरे, अमित सपकाळ, अरुण पाटील, अविनाश चव्हाण, अमित माने, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, गणेश कापरे, ओंकार यादव, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, रवीराज वर्णेकर, शिवाजी गुरव तसेच कराड शहर पोलीस स्टेशनकडील विजय मुळे, अनिल स्वामी, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, संग्राम पाटील, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांनी कारवाई केली.
गेल्या २ वर्षांत १११ पिस्टल जप्त
सातारा जिल्हा पोलीस दलाकडून माहे नोव्हेंबर २०२२ पासून ते आजपावेतो एकूण १११ देशी बनावटीची पिस्टल, ४ बाराबोर बंदूक, २ रायफल, २६० जीवंत काडतुसे, ३८४ रिकामी काडतुसे, ५ रिकामे मॅगझीन करण्यात आलेली आहेत.