Site icon police varta

Police Inspector Tayyab Mujawar of Pandharpur Taluk

चाकूच्या धाकावर मोबाईल, पिकप गाडी चोरणारे तिघे जेरबंद
पंढरपूर तालुकाच्या पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर व पथकाची कौतुकास्पद कारवाई

✒️ उदय आठल्ये
पंढरपूर : चाकूचा धाक दाखवून चालकाला मारून मोबाईल व पिकअप गाडी चोरून नेणाऱ्या तिघांना जेरबंद करण्यात आले. ही कारवाई पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर व त्यांच्या पथकाने केली. या कारवाईत आरोपींकडून ११ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


एका चालकाला अडवून चाकूचा धाक दाखवत मारहाण करून करून त्याचा मोबाईल, पिकअप गाडी तिघांनी पळवली. या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात (गुन्हा रजिस्टर नंबर ४५ /२०२५ बीएनएस कलम ३०९(६) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी गोविंद लिंबा पवार (वय 23 वर्ष राहणार अंकोली तालुका मोहोळ), निबालअहमद शेख (वय 21 वर्ष राहणार चिंचोली तालुका पंढरपूर), संच्या मिटकरी (वय 32 राहणार आंबे चिंचोली तालुका पंढरपूर) यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल पोलिसानी जप्त केला.

या गुन्ह्याचा उलघडा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर, पोलीस उपनिरीक्षक भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तोंडले, हवालदार रोकडे, गजानन माळी, विनायक क्षीरसागर, अंमलदार सागर गवळी, आवटी यांनी केला.

Exit mobile version