Site icon police varta

Pandharpur City Police

पिस्टल बाळगणाऱ्याला ठोकल्या बेड्या
पंढरपूर शहर पोलिसांची उल्लेखनिय कारवाई

Police varta News Network
सोलापूर : बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई पंढरपूर शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली. या कारवाईत देशी बनावटीचे पिस्टल मॅक्झीन जप्त करण्यात आले.

सध्या राज्यभरात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यामुळे पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पथक गैरकृत्यांवर लक्ष ठेवून असताना खबऱ्याने पिस्टल बाळगणाऱ्याची माहिती दिली. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी जुना अकलुज रोड, जॅकवेल, इसबावी येथे सापळा लावून एका व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल आढळले. चौकशीदरम्यान आरोपीने स्वत:चे नाव महम्मद युसुफ पठाण (वय २७ वर्ष, रा. चौंडेश्वर वाडी, खंडाळी ता. माळशीरस, जि. सोलापूर) असे सांगितले. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात ( गुरनं. ६९७/२०२४) भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, २५, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर विभाग, पंढरपूर अर्जुन भोसले, व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि आशिष कांबळे, सपोउनि राजेश गोसावी, शरद कदम, हवालदार सुरज हेंबाडे, प्रसाद औटी, सिरमा गोडसे, सचिन हॅबाडे, नितीन पलुसकर, विठ्ठल विभुते, दादा माने, अंमलदार बजीरंग बिचुकले, समाधान माने, शहाजी मंडले, निलेश कांबळे यांनी केली.

Exit mobile version