police varata

One People One Plant

खाकीतले निसर्गप्रेमी सुमित राठोड यांना सलाम

नववर्षानिमित्त ‘वन पिपल वन प्लॅन्ट’

✒️ उदय आठल्ये (पोलीस मित्र)

मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलात कर्तव्यासोबत विशेष कलागुण, माणुसकी जपणाऱ्यांची मोठी फौज आहे. अशाच अधिकारी, अंमलदारांच्या शोधात ‘पोलीस वार्ता’ची टीम असते. ही मोहीम सुरू असताना खाकीतले निसर्गप्रेमी पोलीस नाईक सुमित राठोड यांच्या संकल्पाबाबत समजले. नववर्षानिमित्त वन पिपल वन प्लान्ट हा उपक्रम ते राबविणार आहेत. याची सुरुवात त्यांनी स्वत:पासून केली असून १ जानेवार २०२५ रोजी त्यांनी नागपूर येथील आयजीपी कार्यालय परिसरात आंब्यांचे वृक्ष लावले.
या उपक्रमाला ‘पोलीस वार्ता’ टीमचा सलाम! निसर्ग जोपासण्यासाठी सुमित राठोड यांना मनपूर्वक शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!