Site icon police varta

On the occasion of World Anti-Drug Day | Andheri Railway Police | Addiction-free life

जागतिक अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त अंधेरी रेल्वे पोलिसांचे आकाश कॉलेजच्या २५० विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनाचे धडे

मुंबई – 26 जून रोजी साजरा होणाऱ्या जागतिक अमली पदार्थविरोधी दिनाच्या (World Anti-Drug Day) पार्श्वभूमीवर अंधेरी रेल्वे पोलिस ठाण्याच्या(Andheri Railway Police) वतीने महत्त्वपूर्ण जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत अंधेरी पूर्व येथील आकाश कॉलेज ऑफ कॉमर्सच्या २५० विद्यार्थ्यांना व्यसन मुक्त जीवनाचे (Addiction-free life) धडे देण्यात आले.

आजचा विद्यार्थी भारत देशाचे भवितव्य आहे. सध्याच्या हायटेक जगात वावरताना अनेक व्यसनाला बळी पड़त आहेत. ही बाब लक्षात घेत मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्त एम. सागर कलासागर यांनी विद्यार्थ्यांच्या व्यसनमुक्त जीवनासाठी विशेष राबविला. याचाचा एक भाग म्हणून अंधेरी लोहमार्ग पोलिसांनी आकाश कॉलेज ऑफ कॉमर्स महानि महाविद्यालयात जनजागृतीस्पर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक प्रज्ञा देशमाने (Police Sub-Inspector Pragya Deshmane) यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम सांगितले.


व्यसनाचे दुष्परिणाम | Side effects of addiction

1: कोणताही अमली पदार्थ शरीरासाठी अत्यंत घातक आहे.
व्यसनाचा परिणाम फक्त त्या व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण कुटुंब त्याच्या दुष्परिणामांना सामोरे जाते.
अमली पदार्थांचे सेवन व्यक्तीच्या वर्तणुकीत व चारित्र्यात नकारात्मक बदल घडवते.
2: NDPS कायदा 1985(NDPS Act 1985) नुसार भारतात नशिले पदार्थांचे सेवन हा कायद्याने शिक्षेस पात्र गुन्हा आहे.
3: रेल्वे प्रवासात अनोळखी व्यक्तींकडून अन्नपदार्थ घेणे धोकादायक असून, त्यामध्ये नशिले पदार्थ असण्याची शक्यता असते.
4: रेल्वे प्रवासादरम्यान संशयित व्यक्ती आढळल्यास रेल्वे पोलीस हेल्पलाईन 1512 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

Exit mobile version