लोणंद पोलिसांकडून गुन्ह्याची उकल
उदय आठल्ये
सातारा : मंदिर परिसरात खून करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस दलाच्या लोणंद पोलिसांनी केली.
१४ ऑक्टोबर रोजी रात्री ७:४० च्या सुमारास काळज ता. फलटण गावी लक्ष्मी देवी मंदीरात नितीन तकदिर मोहीते (४०, रा. काळज ता. फलटण जि. सातारा) याचा खून झाला. ही माहिती रितेश राजेश मोहीते (२१, रा. काळज ता. फलटण जि. सातारा) याने लोणंद पोलिसांना दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, मा. डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण भाग व बाळासाहेब बालचीम उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांनी सदर गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवुन तपासास एक महत्वाची दिशा देवुन आरोपी शोध घेणेकामी सपोनि सुशिल बी. भोसले लोणंद पोलीस स्टेशन यांना सुचना देवुन स्थानिक गुन्हे शाखा सातारा येथील पथक, सायबर शाखेचे अंमलदारांचे पथक, फलटण ग्रामीण पोलीस, फलटण शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी तपास सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे सपोनि सुशिल भोसले, त्यांचे पथकातील अधिकारी व अंमलदारांसह सायबर पोलीस पथकाला आरोपींची माहिती समजली. कृष्णा दिपक मोहीते व त्याचे साथीदार यांनी फिर्यादी रितेश राजेश मोहीते व काळज येथील एक विधीसंघर्षीत बालक यांचे मदतीने कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, काळज ता. फलटण येथे नितीन तकदिर मोहीते व विमल महादेव मोहीते हे दोन्ही कुटुंब शेजारी शेजारी राहणारे असून दोघांचे घरामधील जागेच्या कारणावरून फेब्रुवारी महिन्यातमध्ये नितीन मोहीते व विमल मोहीते यांचा वाद झाला होता. त्यावेळी नितीनने विम यांना धक्काबुक्की केली. त्यामुळे जखमी झालेल्या विमल यांना उपचारासाठी १० हजार रुपये खर्च आला. त्यानंतर सदरची भांडणे त्यांनी आपसात मिटींग घेवुन गावपातळीवर मिटवली होती. परंतु विमल मोहिते यांचा मुलगा दिपक महादेव मोहीते याने त्याचा राग मनात ठेवला होता. त्यातुनच दिपक महादेव मोहीते (वय ४७) वर्षे त्याची पत्नी ज्योती दिपक मोहीते (वय ४४), मुलगा कृष्णा दिपक मोहीते (वय २२, तिघे रा. शिवाजीपार्क समर्थनगर नवी सांगवी पुणे मुळ रा. काळज ता. फलटण जि. सातारा) यांनी नितीन याचा खून करण्याचा कट रचला. आरोपी कृष्णा दीपक याने पुण्यातील मित्र यश बबन सोनवणे वय (18 वर्षे रा. मनपा शाळेच्या पाठीमागे सुर्यमंदिराजवळ हडपसर माळवाडी पुणे-28), विशाल अशोक फडके (वय 20 रा. नवी सांगवी साई चोक पुणे), ओंकार किशोर खंडाळे (वय 19 वर्षे रा. पिंपळे गुरव लक्ष्मीनगर पुणे), ऋषीकेश तिर्थराज सकट (वय 19 रा. पिंपळे गुरव लक्ष्मीनगर पुणे) येथील विधीसंघर्षीत बालक व इतर यांच्यासह काळज ता. फलटण जि. सातारा येथे नितीनवर पाळत ठेवली. रितेश मोहीते व विधीसंघर्षीत बालक यांनी नितीन मोहीतेच्या हालचाली कृष्णा मोहीते यास फोनवरुन दिल्याने व नितीन मोहीते हा लक्ष्मी देवी मंदीराचे मंडपामध्ये बसला आहे असे सांगीतले. त्यानुसार रात्री ७.४० च्या सुमारास कृष्णा मोहीते याने त्याचे साथीदार विशाल अशोक फडके (वय 20 रा. नवी सांगवी साई चोक पुणे), ओंकार किशोर खंडाळे (वय 19 वर्षे रा. पिंपळे गुरव लक्ष्मीनगर पुणे), त्रऋषीकेश तिर्थराज सकट (वय 19 रा. पिंपळे गुरव लक्ष्मीनगर पुणे), पुणे येथील एक विधीसंघर्षीत बालक व इतर आरोपींसह चार मोटारसायकलींवरुन पालघन, कोयता, चाकु घेऊन नितीन तकदिर मोहीते याचे डोक्यात, तोंडावर, दोन्ही हातावर, दोन्ही पायावर सपासप गंभीर वार करुन चाकु पोटात व छातीत भोकसुन गंभीर जखमी करुन खून केला, अशी कबुली आरोपींनी दिली.
सदरची कारवाई समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, मा. डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, मा. राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण भाग व मा. बाळासाहेब बालचीम, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग, पो.नि. अरुण देवकर स्थागुशा सातारा यांचे मार्गदर्शनाखाली, तपासी अधिकारी सुशिल बी. भोसले, पोउनि शिवाजी आर. काटे, विशाल कदम, सपोफौ. दिलीप येळे, विष्णु धुमाळ, देवेंद्र पाडवी, पोहवा विजय पिसाळ, नितीन भोसले, पोहवा संजय बनकर, सर्जेराव सुळ, संतोष नाळे, रत्नसिंह सोनवलकर, अतुल कुंभार, योगेश कुंभार, धनाजी भिसे, महेश टेकवडे, प्रविण मोरे, राहुल मोरे, शुभांगी धायगुडे, पो.ना. सिदधेश्वर वाघमोडे, पोकॉ. विठठल काळे, केतन लाळगे, सुनिल नामदास, अंकुश कोळेकर, गोविंद आंधळे, अभिजीत घनवट, अमोल जाधव, संजय चव्हाण, जयवंत यादव, मपोकॉ. स्नेहल कापसे, ऋतुजा शिंदे, भारती मदने, अक्षदा अहिवळे, प्रियंका नरुटे, स्थानिक गुन्हे शाखा साताराचे सपोनि रोहीत फणें, पोउनि. परितोष दतीर, पोहवा संतोष सपकाळ, शरद बेबले, प्रविण फडतरे, अविनाश चव्हाण, अमीत सपकाळ, प्रमोद सावंत, अमीत झेंडे, स्वप्नील कुंभार, लक्ष्मण जगधाने, अरुण पाटील, अजित कर्णे, राकेश खांडेके, ओंकार यादव, रोहीत निकम, शिवाजी गुरव, रवि वर्णेकर, सायबर शाखेतील मपोहवा श्रदधा माने, प्रशांत मोरे, ओंकार डुबल, जय गायकवाड, फलटण शहर पोलीस स्टेशनचे सपोनि नितीन शिंदे, पोहवा धापते, सचिन जगतापख अमोल कर्णे, टिके, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल वायकर, पोउनि बदने, पोहवा नितीन चतुरे, श्रीनाथ कदम, हणमंत दडस व अविनाश नलवडे (जि.वि.शा.) यांनी केली आहे.