Site icon police varta

Murder of youth in Pune city ।दुचाकीच्या पेपरसाठी तरुणाच्या पोटात खुपसला चाकू

१२ तासांत आरोपींना धाडले तुरुंगात

प्रत्येक गुन्ह्यामागे कारण असतं. अनेकदा गुन्ह्यांमागची कारणं क्षुल्लक असतात. पण रागाच्या भरात संयमाचा अंत होतो अन् जीव गमवावा लागतो. याचा प्रत्यय विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात आला. दुचाकीचे पेपर देत नसल्याने तीन जणांनी तरुणाच्या गळ्यावर वार (Murder of youth in Pune city) करून पोटात चाकू खुपसला. या धक्कादायक गुन्ह्याचा तपास १२ तासांत करून गुन्हे शाखा ५ च्या पथकाने दोघांन अटक केली. या आरोपींनी गुन्ह्यादरम्यान वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.

असा घडला गुन्हा…


दीड वर्षांपूर्वी बबलू उर्फ शाहनवाज मुनीर सय्यद याच्याकडून साहिल युसुफ शेख (वय 23 वर्ष रा पिसोळी कोंढवा पुणे) याने दुचाकी विकत घेतली होती. या दुचाकीचे वारंवार कागदपत्रे मागितली. मात्र बबलू देण्यास टाळाटाळ करत होता. यामुळे साहील संतापला होतो. दरम्यान, बबलू, साहील व त्याचे मित्र सज्जुद्दिन उर्फ सद्दाम सिरखुद्दिन शेख (वय 35) व नोमन खान (रा पिसोळी पुणे) हे दारू पिण्यास बसले. त्यावेळी पुन्हा दुचाकीच्या कागदपत्रांचा विषय निघाला आणि त्यांच्यात वाद झाला. बबलूने रागाच्या भरात शिवीगाळ केल्याने साहिल युसुफ शेख (वय 23, रा पिसोली कोंढवा पुणे), सज्जुद्दिन उर्फ सद्दाम सिरखुद्दिन शेख (वय 35, रा सायमा अपा शिवणेरीनगर कोंढवा पुणे) व नोमन खान (रा पिसोळी पुणे) हे तिघेही संतापले. त्यांनी बाळगलेल्या चाकूने बबलूचा खून केला. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात (गु. क्र. न 1229/ 2023) भादंवि कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा ५ च्या पोलिसांनी करून आरोपींना अटक केली.

यांनी उघडकीस आणला गुन्हा…

हा गुन्हा पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार, रामनाथ पोकळे, (सह पोलिस आयुक्त-अति. कार्यभार) अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे, अमोल झेंडे पोलिस उप आयुक्त गुन्हे, सतीश गोवेकर, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे 2 पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली युनिट 5 गुन्हे शाखा वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी, सहा पो निरीक्षक कृष्णा बाबर, पोलिस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे,चैताली गपाट, पोलिस अमलदार रमेश साबळे, राजस शेख, प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, दया शेगर, विनोद शिवले, पृथ्वीराज पांडूळे, दाउत सय्यद, अमित कांबळे, अकबर शेख, पल्लवी मोरे यांनी केली आहे.

Exit mobile version