Site icon police varta

Large quantity of illegal weapons seized due to Constable Amol Todkar

पायधुनीत खंडणी विरोधी पथकाची धडाकेबाज कामगिरी

हवालदार अमोल तोडकर यांच्यामुळे २ पिस्तूलं, १ रिव्हॉल्वर, ३ गावठी कट्टे, २ रिकाम्या मॅगझिन आणि ६७ जिवंत काडतुसे जप्त

मुंबई : मुंबईच्या पायधुनी परिसरात खंडणीविरोधी पथकाने बेकायदेशीर शस्त्रसाठ्यावर कारवाई केली. हवालदार अमोल तोडकर यांना प्रभू हॉटेल समोरच्या लेनमध्ये संशयित इसम विनापरवाना शस्त्रे आणि काडतुसे विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार २८ नोव्हेंबर रोजी खंडणी विरोधी पथकाने सापळा लावून तीन संशयितांना रंगेहात पकडले.

या आरोपींकडून २ पिस्तूलं, १ रिव्हॉल्वर, ३ गावठी कट्टे, २ रिकाम्या मॅगझिन आणि ६७ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
हवालदार अमोल तोडकर यांच्या माहितीच्या बळावर पार पडलेली ही कारवाई मुंबई पोलिसांच्या सतर्कतेचे आणि कार्यक्षमता दाखवणारी आहे. बेकायदा शस्त्रांचा मोठा साठा जप्त केल्याने मुंबईत होणाऱ्या संभाव्य गुन्ह्यांना मोठा धक्का बसला आहे.

अटक आरोपींची नावे

  1. अभिषेककुमार अंजनीकुमार पटेल (वय २६)
  2. सिद्धार्थ सुबोधकुमार सुमन उर्फ गोलु (वय २३)
  3. रचित रामशिषकुमार मंडल उर्फ पुष्पक (वय २७)

यांनी केली उत्तम कामगिरी

मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशी कुमार मीना, उपायुक्त (प्रकटीकरण) दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, डी (विशेष) किशोरकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुधीर जाधव, पोनि सुनिल पवार, अरुण थोरात, सपोनि मारुती कदम, जालिंद लेंभे, मालमत्ता कक्षाचे सपोनि संतोष पवार, सपोउपनि संदीप ब्रिद, हवालदार संतोष सुर्वे, विजय थोरात, निलेश कंद, मुळे, रोहन सुर्वे, तोडकर, धादवड, अंमलदार राजाराम मोटे, जमील शेख, कोळी, हवालदार सुशिल साळुंखे व विशेष पथकातील हवालदार हरिष दलाल, शेखर पाटील, वी राठोड, अंमलदार संतोष वायाळ उत्कृष्ठ कदम यांनी या कामगिरीत सहभाग नोंदवला.

Exit mobile version