Site icon police varta

पोलीस दलाच्या इतिहासात साताऱ्याची सुवर्ण नोंद करणारे आयपीएस समीर शेख। IPS Sameer Shaikh

उदय आठल्ये

कोणतेही जिल्हा पोलीस दल असो ज्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली सबंध पोलीस खाते कर्तव्य बजावतात त्यांचा ‘कॅप्टन’ खमक्या असावा लागतो. त्यामुळे अवैध धंदेवाल्यांच्या गोटात दहशत पसरते. काहीशी अशीच प्रतिमा आहे डॅशिंग अधिकारी आयपीएस अधिकारी समीर शेख यांची! अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या आजवरचा जीवनप्रवास ‘पोलीस वार्ता’च्या डिजीटल दिवाळी अंकाच्या अनुषंगाने पोलीस मित्र तथा पोलीस वार्ताचे संपादक श्री उदय आठल्ये यांनी अधोरेखित केला आहे.

आयपीएस समीर शेख यांचा परिचय

ठाणे जिल्ह्यातील मीरा रोडच्या शांती पार्क भागात वास्तव्याला असलेल्य् मध्यमवर्गीय कुटुंबात समीर शेख यांचा जन्म झाला. तेथील सेंट झेवियर्स शाळेत त्यांचे शिक्षण झाले. बालपणापासून प्रशासकीय सेवा कर्तव्य बजावण्याचा निश्चय केल्याने समीर शेख यांना खाकी वर्दीची आवड निर्माण झाली. दहावीत उत्तम गुण मिळाल्यानंतर त्यांनी विलेपार्ले येथील नावाजलेल्या साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. वडील अभियंता असल्याने त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेण्याचे ठरवले. चांगले गुण मिळाल्याने बिट्स पिलानीसारख्या नावाजलेल्या संस्थेत ते दाखल झाले. समीर शेख यांनी इलेक्ट्रॉनिकमध्ये अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. शिक्षण पूर्ण होताच त्यांनी यूपीएससीच्या तयारीसाठी नवी दिल्लीला रवाना झाले. सन २०१६ साली समीर शेख दुसऱ्या प्रयत्नात आयपीएस झाले. समीर शेख हे आपल्या प्रशिक्षण कालावधीत पण अग्रेसर राहिले. या कामगिरीमुळे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ३० ऑक्टोबर २०१७ रोजी हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये पासिंग आऊट परेड दरम्यान भारतीय पोलीस सेवा (IPS) प्रोबेशनर समीर समीर अस्लम शेख यांना प्रतिष्ठित पंतप्रधान बॅटन आणि गृहमंत्री पदाच्या पुरस्काराने सन्मानित केले. अष्टपैलू आयपीएस प्रोबेशनरसाठी रिव्हॉल्व्हर प्रदान करण्यात आले. या प्रसंगी १३६ आयपीएस प्रोबेशनर्स ‘दीक्षांत’ (पासिंग आऊट) परेडचे नेतृत्व आयपीएस समीर शेख यांनी केले.

पहिली नियुक्ती सातारा जिल्हा पोलीस दलात

प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर 2018 साली सातारा जिल्ह्यात समीर शेख यांची सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. उत्कृष्ठ कार्यशैलींने त्यांनी सर्वसामान्य नागरिकांची व खात्यांतर्गत सर्वांची मने जिंकून कर्तव्याचा अनोखा ठसा उमटविला. एकापेक्षा सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून समीर शेख साधारण 17 महिन्यांच्या कालावधीत गुन्हेगारांना हादरा दिला. आपल्या समान अनेक आयपीएस घडावेत यासाठी त्यांनी कार्यालयामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाच्या रूपात पुस्तकांचा खजिना उभारला. दरम्याच्या काळात कोरोना प्रादुर्भावाच्या काळात नागरी हित जपत त्यांनी नियमांचे पालनाला प्राधान्य दिले. कोरोना बाधित झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपचारावर त्यांनी विशेष लक्ष दिले.

पदोन्नतीवर सातारा ते गडचिरोलीचा प्रवास

सातारा जिल्हा पोलीस दलातील कार्यकाळ यशस्वीपणे पुूर्ण केल्यानंतर सन 2020 मध्ये समीर शेख यांची पदोन्नतीवर गडचिरोली येथे अपर पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली. गडचिरोली कर्तव्याला असताना आयपीएस समीर शेख यांनी कनिष्ठांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावले. त्यामुळेच सर्वसामान्य नागरिक असो वा कर्मचारी, अधिकारी वर्गात समीर शेख यांच्या प्रति आदरभावना निर्माण झाली. दोन वर्षे नक्षलवादी भागात कर्तव्य बजावल्याने समीर शेख यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुन्हा साताऱ्यात बदली

गडचिरोली येथील कार्यकाल पुूर्ण करुन पदोन्नतीने आयपीएस अधिकारी समीर शेख हे सन 2022 मध्ये ऑक्टोबर महिन्यात सातारा जिल्ह्यात पोलीस अधीक्षक पदी नियुक्त झाले. समीर शेख पुन्हा आल्याने स्थानिकांमध्ये कमालीचा उत्साह पाहावयास मिळाला. विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सामान्य नागरिक त्यांच्या भेटीला येऊ लागले. त्यावेळी शेख म्हणाले की, माझ्या स्वागतासाठी बुके नको, पुस्तके आणा, या व्यक्तव्याने नागरिकांच्या मनी त्यांच्या प्रति आणखी आदारभाव निर्माण झाला.

अनोख्या उपक्रामाची जोरदार चर्चा
साताऱ्याचा पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच असलेल्या दिवाळीचे औचित्य साधून शेख यांनी हुतात्मा सैनिकांच्या आई वडिलांबरोबर दिवाळी साजरी केली. हा उपक्रम संपूर्ण जिल्हा पोलिस दलात राबविण्यात यावा, असे आवाहन शेख यांनी केल्याने गोरगरीबांची दिवाळी गोड झाली.

अवैध धंद्यांवर धाडी


सातारा जिल्हा पोलीस दलाचे अधीक्षक म्हणून रुजू होताच समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली धडाकेबाज कारवाया सुरू झाल्या. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या काळ्या धंद्यांवर पोलिसांनीन धाडी टाकल्या. मटका, जुगार, खासगी सावकारी, ऑनलाइन लॉटरी, हातभट्टी, सामूहिक गुंडगिरी जिल्ह्यात बेकायदेशीर धंदे अवैध गुटखा अवैध दारू विकणाऱ्यांना तुरुंगात धाडण्यास सुरुवात केली. तसेच गांजाची शेती, चंदन तस्करी करणाऱ्यांना सळो की पळो करून सोडले.

प्रतापगडची यशस्वी मोहीम

१० नोव्हेंबर २०२२ रोजी सातारा जिल्ह्यातील प्रतापगड परिसरात असलेल्या अफजल खानच्या थडग्याजवळचं अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात रातोरात हटविला. या ठिकाणी जमावबंदीचं कलम 144 लागू करण्यात आलं आहे. अतिक्रमण पाडण्यासाठी तयारी सुरु झाली. शिवप्रताप दिनी अवतीभोवती अनेक हजारोंच्या संख्येने शिवभक्त महाबळेश्वर तालुकामध्ये दाखल झाले होते. मात्र पोलिसांनी याबाबत कोणासही प्रतापगड किल्ल्याच्या परिसरात फिरण्यास मनाई केली होती. याच सर्जिकल स्ट्राइकचे नेतृत्व जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत पार पाडले.

तक्रारदारांशी सवाद

जिल्ह्यातून अनेक तक्रारदार त्यांच्या तक्रारी घेवून पोलीस अधीक्षक कार्यालयात येत. तक्रारदारांचा ओघ मोठया प्रमाणात होता तसेच कार्यालयीन कामकाज, कायदा व सुव्यवस्था, राजकिय दौरे, आंदोलन, संप, दाखल होणारे संवेदनशील गुन्हे या मुळे तक्रारदार यांना पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये बराच वेळ वाट पाहून ताटखळत बसावे लागत होते. त्यामुळे तक्रारदार यांचा वेळ व पैसा खर्च होत होता. जिल्हयातुन येणाऱ्या तक्रारदार यांचेकरीता काहीतरी करण्याची इच्छा होती. त्यासाठी सहकारी अधिकारी यांचेशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेवून जिल्हयातून येणा-या तक्रारदार जनतेसाठी उपविभागीय स्तरावर संवाद तक्रारदारांशी हा उपक्रम राबवून महिन्याचे प्रत्येक पहिल्या व तिसऱ्या गुरूवारी उपविभागीय स्तरावर आम्ही, अपर पोलीस अधीक्षक सातारा असे एका उपविभागात जावुन येणा-या तक्रारदारांशी संवाद साधुन त्यांचे तक्रारीचे निरासरण करण्यास सुरूवात केली. त्यामुळे तक्रारदार यांचा वेळ व पैसा दोन्ही बचत होण्यास मदत होवुन त्यांचे तक्रारीची दखल घेण्यास सुरूवात झाली. संवाद तक्रारदारांशी या योजनेची सुरूवात जुन २०२३ पासुन केली असुन आतापर्यंत ७ उपविभागीय स्तरावर १०९४ तक्रारदार हजर झाले असून त्यांचे ४७२ तक्रारीची दखल पोलीस दलातर्फे घेतली आहे. तसेच १८ अर्जांमध्ये दखलपात्र गुन्हे दाखल केले आहेत.

आयपीएस समीर शेख यांनी आजवर उत्तोत्तम कामगिरी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा पोलीस दल सध्या उल्लेखनिय कर्तव्य बजावत आहे. लिखाणाला शब्द मर्यादा असल्याने ही कामगिरी एका लेखात देणे शक्य नाही. त्यामुळे येत्या नववर्षात पुन्हा ‘पोलीस वार्ता’ डिजीटल अंकात समीर शेख यांची कामगिरी पुन्हा संकलित करून वाचकांपर्यंत त्यांच्या कर्तव्याचे आणखी पैलू पोहोचवण्याचा प्रयत्न असेल.

नोव्हेंबर 2022 ते 2024 सप्टेंबर अखेर कामगिरी

अवैध जुगार केसेस
एकूण गुन्हे – 1751
एकूण आरोपी – 3238
जप्त मुद्देमाल – 2,36,97,282/-

अवैध दारूबंदी केसेस
एकूण गुन्हे – 3710
एकूण आरोपी -3729
जप्त मुद्देमाल – 1,80,57,894/-

अवैध वाळू कारवाई
एकूण गुन्हे – 40
एकूण आरोपी – 62
जप्त मुद्देमाल – 2,32,10,500/-

गुटखा
एकूण गुन्हे – 85
एकूण आरोपी – 151
जप्त मुद्देमाल-37028756/-

NDPS
एकूण गुन्हे – 36
एकूण आरोपी – 53
गांजा जप्त मुद्देमाल- 747.915 kg, 2,03,75,570/-
अफू जप्त मुद्देमाल- 203.514 kg, 27,13,640/-

अवैध शस्त्र
एकूण गुन्हे – 59
जप्त हत्यार – 97 पिस्टल
बारा बोअर बंदुक – 4
रायफल – 2
जिवंत काडतुस – 224
रिकामी काडतुस- 383
रिकामे मॅग्झिन- 4
आरोपी – 162

मोक्का
प्रस्ताव मंजूर – 10
आरोपी संख्या – 128

MPDA
प्रस्ताव / मंजूर – 1

तडीपार
तडीपार टोळ्या – 32
तडीपार इसम – 103

नोव्हेंबर 2022 ते सप्टेंबर 2024 अखेर मालमत्ते (दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी) विषयक गुन्हे उघड गुन्हे – 1171
जप्त मालमत्ता- 10,16,02,750/-

Exit mobile version