भारतातर्फे एकमेव नेतृत्व करणाºया विवान लहानेने पटकावले तिहेरी सुवर्ण पदक
- मुंबई : पोलीस कुटुंबातील मुलं हुशार… याचा प्रत्यय पुन्हा एकदा ७ वर्षीय विवान लहाने याच्या उत्तम खेळीमुळे आला. अमेरिकेत आयोजित केलेल्या तायक्वांदो स्पर्धेत भारतातर्फे एकमेव सहभागी झालेल्या विवानने स्टेट व नॅशनल लेवलवर तिहेरी सुवर्ण पदक पटकावून भारताची प्रतिमा सातासमुद्रापार आणखी उंचावली. या स्पर्धेत यश पटकावणारा विवान हा मुंबई दलातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी गणेश लहाने यांचा नातू आहे.
परदेशात राहून देशाभिमान
विवान हा सध्या युनायटेड स्टेट्समध्ये वास्तव्याला आहे. परदेशात राहूनही लहाने कुटुंबियांची मुंबईतील टिळक नगर, चेंबूर, नाशिक येथील मातीशी नाळ कायम जोडलेली आहे. विवान याने पटकावलेल्या पदकांमुळे इतरांना प्रोत्साहन मिळत असूनयापुढेही भारताची प्रतिमा नेहमीच उंचावत ठेवण्याचा निश्चय विवान यानिमित्ताने व्यक्त केला.
मुंबई, नाशिकमध्ये अनेकांनी व्यक्त आनंद
विवानच्या उल्लेखनीय विजयाची माहिती भारतात समजताच मुंबईतील टिळक नगरमधील रहिवासी आणि नाशिकमधील वंजारी समाज बांधवांनी एकत्र येऊन आनंद व्यक्त करत विवानचे अभिनंदन केले. भविष्यात अशाच प्रकारे तायक्वंदो स्पर्धेत भारताचे नेतृत्व करण्यासाठी अनेकांनी विवानला शुभेच्छा दिल्या.या कौतुकास्पद कामगिरीबद्दल विवानला ‘पोलीसवार्ता’ परिवाराचा मानाचा सलाम!