Site icon police varta

Good performance of Bandra Railway Police

वांद्रे रेल्वे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
कुटुंबीयांचा शोध घेऊन मृतदेहासह लाखोंचा मुद्देमाल केला परत

मुंबई : वांद्रे रेल्वे पोलिसांच्या (Bandra Railway Police) उल्लेखनीय कामगिरीमुळे माणुसकीचे दर्शन घडवले आहे. बुधवार, १८ डिसेंबर २०२४ रोजी सांताक्रूझ रेल्वे स्टेशनच्या(Santacruz Station)फलाट क्रमांक ३ वर ४० वर्षीय अनोळखी इसम बेशुद्ध अवस्थेत सापडला. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कापरे यांनी तत्काळ त्याला कूपर रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वी मृत घोषित केले.(Body Found at Railway Station)

○मृत इसमाजवळील सॅक बॅगेत १ लाख ३५ हजार ६५  रुपये रोख, १० ग्रॅम वजनाची दोन चांदीची नाणी, दोन सोन्zaaयाच्या अंगठ्या, तीन चांदीच्या अंगठ्या आणि दोन मोबाईल फोन होता.  वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.जी. खडकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटमास, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कापरे आणि पोलीस हवालदार चव्हाण यांनी तात्काळ मृत इसमाच्या वारसांचा शोध घेतला.

पावनाक कुटुंबीयांनी मानले आभार

शोधमोहीमेतून मृत व्यक्तीचे ना सचिन धोंडू पावनाक (राहणार गोळीबार रोड, सांताक्रूझ पू.) असल्याचे समजले. वारस भाऊ संदीप पावनाक यांना कागदपत्रांची पूर्तता करून मृतदेह व लाखोंचा मुद्देमाल ताब्यात देण्यात आला. संदीप पावनाक यांनी वांद्रे रेल्वे पोलिसांचे आभार मानले. रेल्वे पोलिसांच्या तत्परतेने व प्रामाणिकपणे पार पाडलेल्या या कर्तव्याची सर्व स्तरांतून प्रशंसा होत आहे.

👉रेल्वे पोलिसांची चांगल्या कामगिरीची आणखी एक बातमी वाचा
👇
बदलापूर रेल्वे स्थानकावर शौर्य दाखवणाऱ्या एमएसएफ, आरपीएफच्या जवानांचा गौरव

Exit mobile version