Site icon police varta

६५ नागरिकांच्या चेहऱ्यावर पुन्हा दिसले हसू । Good performance by Kalwa police

कळवा पोलिसांच्या कारवाईचे कौतुक

ठाणे : गहाळ, चोरीला गेलेले मोबाईल परत मिळतील याची आशा सोडून दिलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू झळकले. त्याला निमित्त ठरले ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील कळवा पोलीस! या पोलिसांनी उत्तमरित्या कारवाया करून जप्त केलेले ७ लाख २० हजार रुपयांचे ६५ मोबाइल संबंधितांना परत केले आहे. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.

ही उल्लेखनिय कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनिरी सागर सांगवे, हवालदार शहाजी ऐडके, हवालदार राहुल पवार, श्रीमंत राठोड, गणेश बांडे, अनिल खुस्पे, अंमलदार अमोल ढावरे, नामदेव कोळी, प्रशांत लवटे यांनी केली.

Exit mobile version