Site icon police varta

Fake shampoo sales in the name of reputed companies exposed

नामांकित कंपन्यांच्या नावाने सुरू असलेली बोगस शॅम्पू विक्री उघड !
सीबी कंट्रोलची दहीसरमध्ये कारवाई

मुंबई : पैशांसाठी कुणाचा जीव गेला, कोणाला काहीही त्रास होवो, याची पर्वा न करता सर्रासपणे बोगस शॉम्पू बनवून विकणाऱ्याची पोलखोल झाली आहे. ही उल्लेखनीय कारवाई मुंबई पोलीस दलाच्या सीबी कंट्रोलच्या पोलिसांनी दहीसरमध्ये केली. या कारवाईत महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात वापरणारे अनेक कंपन्यांचे बोगस शॉम्पू जप्त करण्यात आले आहेत.

मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त निशीत मिश्र यांच्या सूचनेुसार बोगस साहित्य, खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यावर लक्ष ठेवून असताना सीबी कंट्रोलला बोगस शॉम्पू बनवणाऱ्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक दहीसरमध्ये दाखल झाले. तेथे टाकलेल्या धाडीत एक व्यक्ती नामांकित कंपन्यांच्या बाटल्यांमध्ये बोगस शॉम्पू भरत होता. या प्रकरणी दहीसर पोलीस ठाण्यात (CR No 193/2024 U/s 420 IPC r/w 51,63 of Copy right act Registered) गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत वेगवेगळ्या कंपन्यांच्या रिकाम्या बॉटल्स, केमिकल लिक्विड व अन्य साहित्य असा एकूण १ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कौतुकास्पद कारवाई सह पोलीस आयुक्त निशीत मिश्र, पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपेश दरेकर, पोलीस उपनिरीक्षक ज्योती देवकुळे, हवालदार विशाल यादव, अमित वलेकर, महेश नाईक, गणेश डोईफोडे, महेंद्र दरेकर, अंमलदार भरत खारवी, हिना राऊत यांनी केली.

Exit mobile version