Site icon police varta

Environment written exam result declared

पर्यावरण लेखी परिक्षेचा निकाल जाहीर
प्रथम क्रमांक निहाल ढवळे, व्दितीय क्रमांक प्रगती पाटील तर तृतीय क्रमांक नियती खोडके

नागपूर : पर्यावरण विषयी घेतलेल्या परिक्षेचा निकाल ७ एप्रिल रोजी जाहीर झाला. या परीक्षेत प्रथम क्रमांक निहाल ढवळे व्दितीय क्रमांक प्रगती पाटील तृतीय क्रमांक नियती खोडके चतृर्थ क्रमांक ओजस्वी बोबडे पंचम क्रमांक सार्थक मंडाळे यांनी मिळविला. या विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथी सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक रविंद्र भुंरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पाणपोईचे वाटप करुन सन्मानित करण्यात आले.


सुमित राठोड नागपूर राखीव पोलीस बलाता कार्यरत असुन मागील पाच वर्षांपासून ते कर्तव्य बजावून पर्यावरण जोपासण्यासाठी कार्यरत आहेत. पर्यावरणाप्रति लहान वयातच गोडी निर्माण व्हावी म्हणून राठोड हे मोफत कार्यशाळा घेतात व दर तीन महिन्यांनंतर कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांची लेखी परिक्षा घेत असतात.


या निकाल समारंभावेळी अर्नव धोंडरे, काव्या राठोड, अर्थव गेडाम, रुद्रा इंगळे, निशांत मोरे, वेंदाशी पाटील, पृथ्वी पाटील, प्रथमेश खोडके, अर्वन नरड, आयुशी नरड, नक्षीता निशिबकर आदी उपस्थित होते.

Exit mobile version