Site icon police varta

मुंबईत ५१ लाखांचे ड्रग्ज जप्त । Drugs worth 51 lakh seized in Mumbai


परदेशी नागरिकासह दोन तस्करांना अटक

मुंबई : मुंबईतील गोरेगाव व माहिम परिसरात अमली पदार्थविरोधी विभागाच्या कांदिवली व वरळीच्या पथकाने अनुक्रमे २२ किलो ‘गांजा’, २१४ ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन) जप्त केला. या ड्रग्जची किंमत ५१ लाख रुपयांचे निष्पन्न झाले आहे. या कारवाईत एका परकीय नागरिकासह दोन तस्करांना अटक करण्यात आली.


अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे कांदिवली युनिटने २३ सप्टेंबर २०२४ रोजी गोरेगांव, मुंबई परिसरात गस्तीदरम्यान अवैधपणे ‘गांजा’ विक्री करणाऱ्या इसमास ताब्यात घेतले, आरोपीचे ताब्यातून एकूण २२ किलो ‘गांजा जप्त केला. याची किंमत ९ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.


दरम्यान, माहिम परिसरात वांद्रे अमली पदार्थविरोधी पथकाने गस्तीदरम्यान अवैधपणे एम.डी. (मेफेड्रॉन) विक्री करणाऱ्या एका परकीय नागरिकांस ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता ११० ग्रॅम तपकिरी रंगाचे एम.डी. व १०४ ग्रॅम सफेद रंगाचा एम.डी. असा एकूण २१४ ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रॉन) आढळला. याची किंमत ४२ लाख २ हजार रूपये पेक्षा अधिक असल्याचे तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले.

या दोन्ही कारवाया मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त शाम घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कांदिवली अमलीपदार्थ युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव धुमाळ, वरळी युनिटचे पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांचे नेतृत्वाखाली पोलीस पथकांनी केली.

Exit mobile version