Site icon police varta

Drug smugglers in Govandi busted

गोवंडीतील ड्रग्ज तस्करांना दणका
१ हजार ९१० गोळ्यांसह आरोपी गजाआड

मुंबई : गोवंडी-देवनार परिसरात ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला. ही जबरदस्त कारवाई गुन्हे शाखा कक्ष ६ च्या पोलिसांनी केली. स्पास्मो प्रॉक्सिवॉन प्लस, नायट्राझेपॅम आणि क्लोनाझेपॅम या प्रतिबंधित औषधांच्या १ हजार ९१० गोळ्या, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण ९२ हजार ४९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नशेसाठी वापरणाऱ्या या गोळ्या कोठून आणल्या याचा तपास सुरू आहे.

३ डिसेंबर २०२४ रोजी युनिट-६ च्या पथकाने गोवंडी, देवनार, शिवाजी नगर परिसरात गस्त घालत असताना हनीफ हॉटेल गल्लीजवळील जनरल स्टोअरजवळ संशयित व्यक्तीला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने स्वत:चे नाव फुरकान रियाजुद्दीन अन्सारी (वय २८ वर्षे, राहणार प्लॉट नं. २, न्यू गौतम नगर, गोवंडी, मुंबई) असे सांगितले.

या कारवाईत स्पास्मो प्रॉक्सिवॉन प्लस, नायट्राझेपॅम आणि क्लोनाझेपॅमच्या १,९१० गोळ्या (Drug) व रोख रक्कम ५३,२०० रुपये व मोबाईल जप्त करण्यात आला आहे. आरोपीवर देवनार पोलीस (Deonar Police) ठाण्यात एनडीपीएस (NDPS Act) कायद्याच्या कलम ८(सी), २२(सी) अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे.

आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी

आरोपी फुरकान अन्सारीवर याआधीही अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यात चोरी, मारहाण, शस्त्रास्त्र कायदा आणि एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्ह्यांचा समावेश आहे:

  1. गु.र.नं. ५४/१२ कलम ३८० आयपीसी (चोरी)
  2. गु.र.नं. २४०/१२ कलम ३२४ आयपीसी (मारहाण)
  3. गु.र.नं. २६१/१४ कलम ३७९ आयपीसी (चोरी)
  4. गु.र.नं. १५/१७ कलम ४५४, ३८०, ३४ आयपीसी
  5. विशेष गु.र.नं. २९९/२३ एनडीपीएस कायदा
  6. विशेष गु.र.नं. १८६/२४ शस्त्रास्त्र कायदा

या कारवाईत युनिट 6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे (Police Inspector Bharat Ghone), एपीआय गावडे, सपोनि चिकणे, पीएसआय रहाणे, एएसआय देसाई, एचसी चव्हाण, वानखेडे, मोरे, एचसीडी दाढे, पीसी कोळेकर आणि डब्ल्यूपीसी अभंग यांचा समावेश आहे.

ही बातमीही वाचा…
मुंबईच्या वांद्रे अमलीपदार्थविरोधी पथकाची कौतुकास्पद कारवाई
धुळ्यात सुरू असलेल्या गांजाच्या शेतीचा पर्दाफाश
५ कोटी ६३ लाखांचा गांजा जप्त

Exit mobile version