Site icon police varta

दुहेरी हत्याकांडांतील फरार आरोपी गजाआड । Action of Pune Crime Branch

गुन्हे शाख युनिट ६ च्य पोलीस उपनिरीक्षक दळवी, अंमलदार ताकवणे, व्यवहारे, पवार यांची उत्तम कामगिरी

पुणे : हत्याकांडानंतर अडीच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला गजाआड करण्यात आले. ही उल्लेखनिय कारवाई पोलीस उपनिरीक्षक दळवी, अंमलदार ताकवणे, व्यवहारे, पवार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पुणे पोलीस दलाच्या गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने केली.


विधानसभा निवडणुका जाहिर झाल्या आहेत. त्या अनुशंगाने गुन्हे प्रतिबंधक कारवायांसह फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट ६ चे पथक गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी गस्त घालत असताना २२ ऑक्टोबर २०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस उप-निरीक्षक दळवी, अंमलदार ताकवणे, व्यवहारे, पवार यांना लोणीकंद पोलीस ठाण्यात गु.र.नं २०/२०२२, कलम ३०२, ३०७, ३४१, १४३, १४७, १४८, १४९, ४२७ भा.द.वि. सह आर्म अॅक्ट कलम ३(२५), ४(२५) सह क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट ३,७ सह महा. पोलीस कायदा कलम १३५, ३७ (१) (३) सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रन अधिनियम कलम ३ (१) (i) (३) (२) नुसार दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे आरोपी ऋग्वेद जालिंदर वाळके (वय २३ वर्षे) याच्या पेरणे टोलनाका शेजारी सागर हॉटेल जवळ, पेरणे, ता. हवेली, जि. पुणे येथे मुसक्या आवळण्यात आल्या.

ही कारवाई पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे, उपनिरीक्षक दळवी, हवालदार सकटे, मेमाणे, पोलीस नाईक मुंढे, कारखेले, ताकवणे, व्यवहारे, पवार, काटे, घाडगे, तनपुरे, महिला अंमलदार पानसरे, मांदळे यांनी केली.

Exit mobile version