४८ तासांपासून बेशुद्ध, उपचारासाठी दिवसाला लाखोंचा खर्च, मदत करण्याचे आवाहन
मुंबई : मुंबई पोलीस खात्यात कर्तव्याला असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव यांच्या कुटुंबियाच्या वाट्याला वाईट प्रसंगाला आला आहे. ९ नोव्हेंबर रोजी अचानक अवकाळी पाऊस पडू लागला. त्यावेळी जाधव यांचा पुत्र साईल (वय २५) हा आजीची औषधे आणण्यासाठी मोटारसायकलवरून जात होता. अंधेरी पूर्व येथील गोखल पुलाच्या सुरू असलेल्या बांधकामाजवळ त्याच्या मोटारसायकलला अपघात झाला. मोटारसायकलवरून पडल्याने साईलचे हेल्मेट निघाले व डोके दगडावर आपटले. डोक्याला व छातीला गंभीर फटका बसल्याने तो बेशुद्ध झाला. तेव्हापासून अद्याप शुद्धीवर आलेला नाही.
दिवसाला लाखो रुपयांचा खर्च
साईल याच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यासाठी दिवसाला लाखो रुपयांचा खर्च सांगितला आहे. हा खर्च सपोउपनि राजू जाधव यांच्या आवाक्याबाहेर असल्याने मदत करण्याचे आवाहन त्यांनी स्वत: केले आहे. सध्या जाधव हे एल ४ येथे कर्तव्याला आहेत.