A woman’s life was saved because of Mumbai Police woman’s daughter
Policevarta
मुंबईच्या पाेलीस पुत्रीमुळे महिलेचे वाचले प्राण
मुंबई : मुंबई पाेलिसांसह त्यांची मुलेही कायम हुशार आणि सतर्क असल्याचे पुन्हा एकदा समाेर आले आहे. मरिन ड्राईव्ह येथील समुद्रात पडलेल्या पडलेल्या महिलेला पाेलीस अंमलदार हिकणी धांडे यांची पुत्री जानवी व तिचा मित्र आर्यन संजय जाधव यांच्यामुळे जीवदान मिळाले.
सलाम पोलीस पुत्री जानवी, आर्यन व पोलीस पथकाला.
जानवी सिडॅम कॉलेजमध्ये तर आर्यन साठे महाविद्यालयात शिकताे. काॅलेजच्या पहिल्या दिवशी हजेरी लावून दाेघेही मित्र-मैत्रिणींसह मरिन ड्राईव्ह येथे फिरण्यास आले हाेते. त्यावेळी तेथील कट्ट्यावरून एक महिला अचानक समुद्रात पडली आणि बुडू लागली. ते पाहून प्रसंगावधान राखत जानवी व आर्यन यांनी मदतीसाठी काही अंतरावर उभे असलेल्या पाेलिसांना बाेलावून आणले. पाेलिसांनी तात्काळ तेथे धाव घेतली आणि महिलेला बाहेर काढले. जानवी, आर्यन यांनी जपलेल्या माणुसकीबद्दल दाेघांचे तेथे उपस्थित असलेल्यांनी काैतुक केले.