Site icon police varta

कराड शहर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई। A action by the Karad City Police, Local Crime Branch

२४ तासांत दरोड्याच्या गुन्ह्याची उकल
१० जणांना अटक, २ कोटी ८९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

उदय आठल्ये


सातारा : धावत्या वाहनाला अडवून ३ कोटींची रोकड लुटणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात आले. ही धडाकेबाज कारवाई अवघ्या १० तासांत कराड शहर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या आरोपींकडून २ कोटी ८९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

१५ ऑक्टोबर रोजी रात्री १:२० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी ३ कोटी रुपयांची रोकड क्रेटा गाडी (MH12 ML6005 ) मधून मुंबई ते हुबळी प्रवास करत असताना कराड गावच्या हद्दीत कोल्हापुर नाक्यावरुन कोल्हापुर बाजुकडे जात असताना एक पांढरे रंगाची स्विफ्ट गाडी त्यांच्या गाडीचा पाठलाग करू लागली. मलकापुर ता. गावच्या हद्दीत ढेबेवाडी फाट्याच्या पुढे फिर्यादीच्या गाडीसमोर काक आडवी घातली. स्विफ्ट कामधील दोन अनोळखी मुले खाली उतरली. त्यावेळी मोटारसायकलवरून आणखी दोन इसम तेथे आले. त्यापैकी एकाने हॉकीस्टिकने क्लिनर साईटची काच फोडली. तसेच स्विफ्ट कारमधील दोघांनी गाडीचा दरवाजा उघडला व आमची गाडी का दाबली असा जाब विचारत शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. त्यापैकी एकाने फिर्यादीला लाथाबुक्याने मारहाण करून ड्रायव्हर सिट जवळील मोकळ्या जागेमधुन त्याला मागे ढकलले. तसेच उर्वरित दोघांनी अविनाश यास मारहाण केली. तुमच्या जवळ काय आहे ते काढून द्या नाहीतर एक सुध्दा जिवंत राहणार नाही, तुम्हाला ठार मारून टाकतो , असे धमकावत त्यांनी मारहाण करून गाडी गमेवाडी वाटामध्ये थांबवुन ३ कोटी रुपये काढून घेतले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीसह इतरांच्या डोळ्यावर रुमाल बांधला व गाडी थोडे पुढे घेवुन गेले. व आमचे गाडीतील रक्कम दुसरे एका चारचाकी गाडीत ठेवली ती गाडी तेथुन निघुन गेली. त्यानंतर गाडी डी मार्ट मॉलचे पुढील बाजुस असणारे नांदलापुर गावाजवळ रोडवर त्यानंतर आमची गाडी डी मार्ट मॉलचे पुढील बाजुस असणारे नांदलापुर गावाजवळ रोडवर हायवेवर त्यांनी थांबवली. व त्यानंतर ते सर्व निघुन गेले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात 5 दरोडेखोरांवर कराड शहर पोलीस ठाण्यात (गु.र.क्र. 1375/2024 भा.न्या..का. 2023 कलम 311,140 (1),324 (4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. ए. ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सुरू केला. गुन्ह्याचा घटनाक्रम पाहता स्थानिक गुन्हे शाखेचेही पथक या गुन्ह्याचा तपास करू लागले. तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला असता आरोपी आसिफ सलिम शेख (रा. शिंदे गल्ली कराड), सुलताना शकील सय्यद ( रा. मंगळवारपेठ करडी पीराजवळ कराड ता. कराड), अजमेर ऊर्फ अज्जु मोहम्मद मांगलेकर (वय 36 वर्षे रा. अष्टमंगलकार्यालय समोर, गोळेश्वर कार्वेनाका कराड ता. कराड । जि. सातारा), नजर महम्मद आरीफ मुल्ला (वय 33 वर्षे रा. 262 रविवारपेठ कराड), ऋतुराज धनाजी खंडग (वय 29 वर्षे रा. तांबवे ता. कराड जि. सातारा), ऋषिकेश धनाजी खंडग (वय 26 वर्षे रा. तांबवे ता. कराड), करीम अजीज शेख (वय 35 वर्षे रा. 192 मंगळवारपेठ कराड ता. कराड), अक्षय अशोक शिंदे (वय 29 वर्षे रा. तामजाई गल्ली तांबवे ता. कराड सातारा), नजीर बालेखान मुल्ला (वय 33 वर्षे रा. राजीवनगर सैदापुर कराड ता. कराड), शैलेश शिवाजी घाडगे (वय 24 वर्षे, रा. निमासोड ता. खटाव जि. सातारा) अविनाश संजय घाडगे (वय 29 वर्षे रा. निमासोड ता. खटाव जि. सातारा) यांची नावे तपासी पथकाला समजली. या सर्वांना अटक करून २ कोटी ८९ लाख ३४ हजार रुपये हस्तगत करून गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट गाडी, इनोव्हा, सियाज तसेच HF डिलक्स, जुपीटर आदी वाहने जप्त करण्यात आली आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख,  अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर.ए. ताशिलदार, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बधे, सपोनि फारणे, सपोनि.तारू, सपोनि बाबर, सपोनि भापकर, सपोनि, माळी, मसपोनि जाधव, मसपोनि आवंले, मसपोनि. वाघमोडे, मपोउपनि. शितल माने, पोलीस उपनिरीक्षक, शिगाडे, डिसले, पोउपनि भंडारे, पोउपनि मगदुम, अशोक वाडकर, अमोल सांळुखे, सपना सांळुखे, राजेद्र गायकवाड, मपोहवा पुष्पा चव्हाण, पोलीस नाईक अनिल स्वामी, संदीप कुभार, कुलदीप कोळी, संतोष पाडळे, पो.शि. संदीप शेडगे, आनंदा जाधव, धीरज कोरडे, महेश शिंदे, अमोल देशमुख, दिग्विजय सांडगे, मोहसिन मोमिन, संग्राम पाटील, सागर भोसले, विजय गुरव, दिपक सांळुखे, आकाश मुळे, अमित चव्हाण, संजय गायकवाड कपील आगलावे, शितल गवळी, महिला पोलीस सोनाली पिसाळ, स्थागुशा सातारा यांचे कडील शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, गणेश कापरे, मुनीर मुल्ल्ला, लक्ष्मण जगधने अमित माने, मोहन पवार, स्वप्नील दौंड, शिवाजी भिसे, स्वप्नील कुंभार, शिवाजी गुरव, पृथ्वीराज जाधव, पंकज बेचके,सागर बर्गे, मयूर देशमुख, मांतेश कोळी यांनी केली आहे.
Exit mobile version