नववर्षाच्या पहिल्याच दिनी ठाणे पोलीस दलाच्या इतिहासात आणखी एक ‘सुवर्ण’ नोंद
डोंबिवली पोलिसांमुळे २२ तोळे सोने मिळाले परत
डोंबिवली : राज्य पोलीस दलात ठाणे पोलिस आयुक्तालयाचा स्वतंत्र इतिहास आहे. यासाठी प्रत्येक पोलीस अधिकारी, अंमलदार आपापल्या परीने उत्तमरित्या कर्तव्य बजावत आहे. याचा प्रत्यय पुन्हा एकदा नववर्ष २०२५ च्या पहिल्या दिवशी आला. डोंबिवली पोलिसांनी गहाळ झालेले २२ तोळे सोन्याचे दागिने शोधून सुवर्ण नोंद केली.
घटनाक्रम
1 जानेवारी 2025 रोजी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास अश्विनी अजय किर्पेकर (वय ४७) या गणपती मंदिर, मानपाडा ते डोंबिवली रेल्वे स्टेशन दरम्यान (Ganpati Temple, Manpada to Dombivli) रिक्षाने प्रवास करीत होत्या. इच्छितस्थळी उतरताना गडबडीत त्यांची बॅग रिक्षामध्ये राहिली. त्यात 22 तोळे 400 मिली ग्रॅम सोन्याचे दागिणे (किंमत 18 लाख 50 हजार रुपये) व कपडे होते. बॅग विसरल्याचे लक्षात येताच त्यांनी त्वरित डोंबिवली पोलीस ठाणे गाठवले. घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डोंबिवलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड (Senior Police Inspector Ganesh Jawadwad) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नवनाथ वाघमोडे, पोलिस अंमलदार मंगेश वीर यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे रिक्षाचालकाचा शोध घेतला आणि बॅग ताब्यात घेतली.
पोलिसांमुळे महिलेची नववर्षाची आनंदायी सुरुवात
जप्त केलेल्या बॅगेतील ऐवजाची ओळख पटवून वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या हस्ते अश्विनी यांना सोन्याचे दागिणे परत करण्यात आले. अशा प्रकारे डोंबिवली पोलिसांमुळे अश्विनी यांच्या नववर्षाची सुरुवात आनंदायी झाली. याबाबत त्यांनी डोंबिवली पोलिसांचे आभार मानले.
आणखी एक चांगली बातमी वाचा
👇