२५० विद्यार्थी व २५ शिक्षकांना दिले ऑनलाईन फसवणूक टाळण्याचे धडे
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
मिरा रोड : दिवसेंदिवस वाढणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्त मधुकर पाण्ड्ये यांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर यांनी १६ ते २० वयोगटातील शाळा, महाविद्यालयातील २५०विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सध्यस्थितीत घडणारे वेगवेगळे सायबर गुन्हे (Trending Cyber Crimes.), सोशल मिडीयासंदर्भात घडणारे गुन्हे (Social Media Related crimes/social media etiquette), ऑनलाईन सायबर गुन्हयास कशाप्रकारे टाळता येईल याबाबतची माहिती (Precautions to be Taken), ऑनलाईन गुन्हयास बळी पडल्यास तात्काळ कोठे व व कश्याप्रकारे तक्रार नोंदविता येईल याबाबत माहिती दिली.
कोठे आणि कशी कराल तक्रार?
ऑनलाईन फसवणूक झाल्यास तत्काळ नजीकच्या पोलीस ठाणे अथवा सायबर गुन्हे कक्षाशी संपर्क साधावा अन्यथा www.cybercrime.gov.in किंवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार करावी.
