२५० विद्यार्थी व २५ शिक्षकांना दिले ऑनलाईन फसवणूक टाळण्याचे धडे
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
मिरा रोड : दिवसेंदिवस वाढणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्त मधुकर पाण्ड्ये यांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर यांनी १६ ते २० वयोगटातील शाळा, महाविद्यालयातील २५०विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सध्यस्थितीत घडणारे वेगवेगळे सायबर गुन्हे (Trending Cyber Crimes.), सोशल मिडीयासंदर्भात घडणारे गुन्हे (Social Media Related crimes/social media etiquette), ऑनलाईन सायबर गुन्हयास कशाप्रकारे टाळता येईल याबाबतची माहिती (Precautions to be Taken), ऑनलाईन गुन्हयास बळी पडल्यास तात्काळ कोठे व व कश्याप्रकारे तक्रार नोंदविता येईल याबाबत माहिती दिली.