police varata

16 Nigerians arrested for drug smuggling in Navi Mumbai

नवी मुंबईत अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या १६ नायजेरियन नागरिकांना अटक


२५ ठिकाणी धाडी; १२ कोटींचे ड्रगज जप्त
७३ नायजेरियनना भारत सोडण्याच्या नोटिसा

नवी मुंबई : मुंबई पाठोपाठ प्रगती करणाऱ्या नवी मुंबई शहरात सुरू असलेल्या ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला. २४ तासांहून अधिक काळ २५ ठिकाणी सुरू असलेल्या कारवाईत १२ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. या प्रकरणात १६ जणांना अटक करण्यात आली तर ७३ नायजेरियन नागरिकांना भारत देश लवकरात लवकर सोडण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत.

नवी मुंबई शहरात सुरू असलेल्या ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिले. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलीपदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप निगडे व पथकाने स्थानिक पोलीस ठाण्यांचे अधिकारी व अंमलदाराच्या मदतीने १२ डिसेंबर २०२४ रोजी रात्री कोंबिंग ऑपरेशन सुरू केले.

हे अमलीपदार्थ जप्त

या संयुक्त कारवाईत सहभागी झालेल्या १५० पोलीस अधिकारी व अंमलदारांनी २५ ठिकाणी धाडी टाकून २ किलो ४५ ग्रॅम वजनाचे कोकेन (किंमत १० कोटी २२ लाख रुपये), ६६३ ग्रॅम एम.डी. पावडर (किंमत १ कोटी ४८ लाख रुपये), ५८ ग्रॅम मिथिलीन (किंमत ११ लाख ६० हजार रुपये), २३ ग्रॅम चरस (किंमत ३ लाख ४५ हजार रुपये), ३१ ग्रॅम गांजा (किंमत ६ हजार रुपये) असे एकूण ११ कोटी ८६ लाख रूपयांचे अंमलीपदार्थ जप्त केले आहेत. १३ अफ्रिकन नागरिकांसह बनावट पासपोर्ट, विसा बाळगणारे ३ अफ्रिकन नागरिक अशा एकूण १६ जणांना अटक करण्यात आली. याशिवाय पासपोर्ट व विसा संपलेल्या ७३ अफ्रिकन नागरिकांना देश सोडुन जाण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!