police varata

यूपीच्या १८ वर्षांच्या मुलाची खाडीपुलाला गळफास घेऊन आत्महत्या । 18-year-old boy from UP committed suicide by hanging himself at Khadipul

२ तासांच्या अथक प्रयत्नाअंती लटकलेला मृतदेह काढला

सोशल मीडियाद्वारे डोंबिवली लोहमार्ग मृताच्या नातेवाईकांचा घेतला शोध

डोंबिवली : १८ वर्षांच्या राहुल प्रजापती याने भोपर खाडीपुलाला गळफास लावून आत्महत्या केली. २ तासांच्या अथक प्रयत्नाअंती डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी उंचावर लटकलेला मृतदेह खाली उतरवला. तरुणाच्या खिशात कुठलेही ओळखपत्र नसताना केवळ सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून लोहमार्ग यूपीच्या तरुणाच्या नातेवाईकांचा शोध लावून मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला.

दोन दिवसांपूर्वी दिवा-वसई रेल्वे मार्गावरील भोपर येथील खाडीपुलाला गळफा लावून तरुणाने आत्महत्या केली. ही माहिती मिळताच डोंबिवली लोहमार्ग पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह श्वविच्छेदनासठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता १९४ नुसार (९८/२०२४) अपमृत्यूची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा तपास डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज जारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्याचे पीएसआय सोनार, महिला पोलीस अंमलदार जगताप व धडस यांनी सोशल मीडियाचा वापर पुर्पूर वापर करून मृताच्या नातेवाईकांचा शोध घेतला आहे.

२४ तासांत पटवली ओळख

गेल्या काही दिवसांपासून शेकडो जणांचा रेल्वे मार्गांवर अपघाती मृत्यू झाला. त्यातील अनेकांची ओळख पटलेली नाही. त्यामुळे मुंबई लोहमार्गचे पोलीस आयुक्त डॉ रवींद्र शिसवे यांनी मृतांच्या वारसांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरात मृताचा फोटो नागरिकांना दाखवला व तसेच सोशल मीडियाचा योग्य वापर करून मृत तरुणाच्या भावाचा शोध अवघ्या २४ तासांत घेतला. या कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपासी पथकाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!