police varata

Women arrested for stealing from J J Hospital


रुग्णालयात, बसमध्ये मोबाईल चोरणाऱ्या महिलांना अटक
२१ मोबाईल जप्त करण्यात जे जे मार्ग पोलिसांना यश

मुंबई : मुंबई, नवी मुंबई व ठाण्यातील रुग्णालयात, बसमध्ये व गर्दीच्या ठिकाणी मोबाईल व पैसे चोरणाऱ्या महिला टोळीतील दोघींना अटक करण्यात आली. ही कारवाई मुंबईच्या जे जे मार्ग पोलिसांनी केली. या कारवाईत २१ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

वेशांतर करून पोलिसांचा बेस्टने प्रवास

डॉ. वेदिका चंद्रकांत मगर यांचा सर  जे जे रुग्णायलातून मोबाईल चोरीला गेला. या प्रकरणी पोलिसांनी (गु. र. क्र . 54/2024) भादंवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला. गेल्या काही दिवसांपासून जे जे मार्ग परिसरात वारंवार मोबाईल चोरीला जात होते. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तात्काळ आरोपींना अटक करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक कलिम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नेरकर, एएसआय सोलकर, कॉन्स्टेबल तडवी, ठाकूर, शेवरे, राजपूत, घाडगे. महिला पोलीस अंमलदार पाटील, लाड, फाटक यांनी वेशांतर करून सलग आठ दिवस बस स्थानकात सापळा लावला. तसेच गर्दीने भरलेल्या बसमधूनही प्रवास सुरू केला तर दुसरीकडे तांत्रिक माहितीच्या आधारे हवालदार पाटील आरोपींचा शोध घेऊ लागले.

अशी केली कारवाई

पोलिसांची शोधमोहीम सुरू असताना पायधुनी परिसरातील मांडवी येथे दोन महिलांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. तपासी पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपापली नावे बसरी वेणू राजी (वय 38 वर्षे, रा ठी. अंधेरी रेल्वे स्टेशन पूर्व परिसरातील ओवर ब्रिज खालील फुटपाथवर अंधेरी पूर्व, मुंबई ), भूमी अरविंद राजी (वय 30 वर्षे, धंदा मजुरी रा ठी. अंधेरी रेल्वे स्टेशन पूर्व परिसरातील ओवर ब्रिज खालील फुटपाथवर अंधेरी पूर्व, मुंबई.) अशी सांगून आतापर्यंत केलेल्या चोऱ्याची कबुली दिली. तपासादरम्यान त्यांच्याकडून डॉक्टर वेदिका यांच्या मोबाईलसह वेगवेगळ्या कंपन्यांचे २१ मोबाईल जप्त करण्यात आले.

या गुन्ह्यांची उकल

जे जे मार्ग पो ठा. गु र क्र 34/2024 कलम 379 भादंवि, 54/ 2024, एम एच बी कॉलनी पोलिस ठाण्यातील 88/2024 हे गुन्हे उघडकीस आले असून आणखी गुन्हे उघडकीस येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!