police varata

Woman arrested along with agent transporting Bangladeshis to India । बांगलादेशींना भारतात पोहोचवणाऱ्या एजंटसह महिला गजाआड

मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा ६ च्या पोलिसांची कारवाई

मुंबई : बेकायदेशीररित्या बांगलादेशी नागरिकांना बॉडर क्रॉस करून भारतात आणणाऱ्या एजंटसह एका महिलेला अटक करण्यात आली. ही कारवाई मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा ६ च्या पथकाने केली. हा आरोपी त्यांना कामाला लावून त्यांचे पैसेही बांगलादेशात पाठवत होता. या आरोपींना १२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या एजंटने किती बांगलादेशींना भारतात आणले, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अशा प्रकारे कारवाईसाठी रचला सापळा…

गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशी नागरिक मोठ्या प्रमाणात भारतात येत आहे. छुप्या पद्धतीने भारतात येऊन नोकरी-धंदा करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सर्वच पोलीस विभागांना व स्थानिक पोलीस ठाण्यांना दिल्या. त्यानुसार बांगलादेशी नागरिकांचा शोध सुरू असताना गुन्हे शाखा ६ च्या पोलिसांना बांगलादेशी नागरिकांना भारतात आणणाऱ्याची माहिती समजली. त्यानुसार पोलिसांनी शिवडी रेल्वेस्थानकाबाहेर सापळा लावून आरोपी अक्रम नूरनबी शेख (२६) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, तो मूळ बांगलादेशी नागरीक असून, भारत बांग्लादेश सीमा कोणताही कायदेशीर परवानगी न घेता अवैधरित्या सीमा पार करून आल्यावे कबूल केले. त्यावरून त्याचेविरुद्ध आर.ए.के. मार्ग पोलीस ठाण्यात ( गु.प्र.शा., गु.र.क. ९७/२०२३, कलम ३ (अ), ६ (अ), पारपत्र अधिनियम १९५० सह परकीय नागरीक आदेश १९४८ चे कलम ३ (१) सह विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ वे कलम १४ अन्वये) गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याने चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीवरून लिमा शहाजान अलवर (वय २६) हिला नवी मुंबईतील कोपरखैरणे येथून ताब्यात घेण्यात आले. लिमा हीदेखील बांगलादेशी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

कारवाई करणारे पथक

ही कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. शशी कुमार मीना, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१), राज तिलक रौशन व सहायक पोलीस आयुक्त (डी-पुर्व), चंद्रकांत जाधव, कक्ष ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद्र साळुंखे, पो.नि. प्रशांत पवार, पो.नि. हणमंत ननावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. कल्पना माशेरे, पो.उप.नि. नंदकुमार बेळणेकर, स. फौ, २७५३५/सावंत, स. फौ.२७८७१/आव्हाड, स.फौ. ३९५९/कुरडे, स.फौ. २९३६१/ देसाई, पो.ह.क. ३१९५६/पारकर, पो.ह.क. ९७१०६१ / चव्हाण, पो.ह.क. ९८०६९७/ तुपे, पो.ह.क. ०३१००८/वानखेडे, पो.ह.क्र. ०४११३२/गायकवाड, पो.ह. क्र ०५०७४२/मोरे, पो.शि.क. ०६१७०३/घेरडे, पो.शि.क. ०७-०४००/भालेराव, पो.शि.क. ०७-०७७४/ माळवेकर, पो.शि.क. ०८०२९६/कोळेकर, पो.शि.क. ०८०३३९/ इंगळे, म.पो.शि. ०८१४२६/ अभंग, म.पो.शि. ०९०२०५५/सरोदे, म.पो.शि. १४०९८८/सुतार, पो.शि. ०११०६४१/शेख, पो.ह.वा. ९८०७६५/डाले, पो.ह.वा. क. ००६७४/कदम, पो.ह. चा. ०३१५२४/ जायभाये आणि पो.शि.चा.क. १७१३६५/पाटील यांचे पथकाने पार पाडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!