police varata

Unit 6 solved the crime within 10 hours ।पूर्ववैमनस्यातून जीवघेणा हल्ला करणारा अटकेत

१० तासांत युनिट ६ ने केली गुन्ह्याची उकल

मुंबई : पूर्वी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी भररस्त्यात बॅटने एका व्यकीतवर जीवघेणा करणाऱ्याला अटक करण्यात आली. ही घटना चेंबूर परिसरातील सायन-ट्रॉम्बे मार्गावरील ( the Sion-Trombay route) व्ट्न्सि वाईन शॉप समोर घडली होती. या गुन्ह्यातील आरोपीला अवघ्या १० तासात मुंबई पोलीस दलाच्या युनिट ६ च्या (Mumbai Police Crime Branch) पथकाने बेड्या ठोकल्या.

Such a crime happened । असा घडला गुन्हा…

१४ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास आशिष धनावडे उर्फ लखन याने पुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून विनायक भाऊ कांबळे (वय ४२, रा. खारदेव नगर, घटला, गोवंडी) याच्या डोक्याला, उजव्या कानावर व मागील बाजूस बॅटने अनेकदा हल्ला केला. या हल्ल्यात विनायक गंभीर जखमी झला. त्याला घटनास्थळावरील लोकांनी सुराणा रुग्णालात दाखल केले. दरम्यान, या प्रकरणी चुनाभट्टी पोलीस (Chunabhatti Police) ठाण्यात (गु.र.क्र.. ५३३/२३) भादंवि कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

अशी झाली गुन्ह्याची उकल

सदर घटनेची माहिती गुन्हे शाखा, कक्ष ६ यांना मिळताच अधिकारी व अंमलदारांनी आशिष धनावडे उर्फ लखनचा शोध सुरू केला. तपासी पोलिसांची पथके मुंबई व आजुबाजूच्या परिसरात दाखल झाली. आरोपी मुंबईतून बाहेर पळून गेल्याचे समजले. प्राप्त झालेल्या तांत्रिक माहितीचे विश्लेषण करुन आरोपी आशिषच्या विरार पूर्व येथे मुसक्या आवळण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!