मुंबईच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा ५ च्या कारवाईमुळे ५ गुन्ह्यांची उकल
मुंबई : पहाटेच्या आजानपूर्वी मस्जिदमध्ये(theft in masjid) डल्ला मारणाऱ्या आरोपीला गजाआड करण्यात आले. ही कारवाई (mumbai police) मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे शाखा कक्ष ५ च्या पथकाने केली. अजीम मोहम्मद आलम शेख (२९, रा. ठि. छोरी मोहल्ला, कर्नल गंज, कानपूर, राज्य उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे मुंबईतील ४ तर यूपीतील एका गुन्ह्याची उकल झाली आहे. आरोपी सध्या धारावी पोलिसांच्या ताब्यात असून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
मौलानांचे पळवले मोबाईल। Maulana’s mobile phone
धारावीतील मस्जिदमध्ये पहाटे ५.०० वा फजरची नमाज अदा करून मौलाना आराम करत होते. त्यावेळी नमाजच्या बहाण्याने मस्जिदमध्ये आलेल्या व्यक्तीने मौलाना यांचा मोबाईल व पैसे पळवले. अशा प्रकारे धारावी परिसरातील ४ वेगवेगळया मस्जिद मधील इमाम मौलाना यांचे मोबाईल चोरीला गेले. यामुळे खळबळ उडाली. या प्रकरणांची तत्काळ उकल करा, असे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले.
युनिट ५ चे आवळल्या मुसक्या
या गुन्ह्यांचे गांभीर्य पाहता संबंधित पोलीस ठाण्यांच्या पथकांसह युनिट ५ चे पथक आरोपीचा शोध घेऊ लागले. तपासादरम्यान आरोपी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सापळा लावून आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. चौकशीदरम्यान आरोपीकून चोरलेले ७ मोबाईल हस्तगत करण्यात आले. हा आरोपी उत्तर प्रदेशातील कानपूरचा रहिवासी असून त्याने मुंबई व पुणे येथे येत असून त्याने मुंबई, पुणे व त्याचे मूळगाव कानपूर येथील मस्ज्दिमध्ये चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
चोऱ्या करण्यासाठी यूपीहून यायचा मुंबईत

अजीम हा मूळचा यूपीचा असून मुंबईत चोऱ्या करण्यासाठी यायचा. छत्रपती शिवाजी महाराज ट्रमिनस येथील डोरमेट्रीमध्ये ३०० रुपये देऊन केवळ झोपण्यापुरते बेड घ्यायचा आणि पहाटेच्या सुमारास मस्जिदमध्ये चोऱ्या करायचा.
- उघडकीस आलेल्या गुन्हे….
i) धारावी पोलीस ठाणे G.R.C. 600/23 पेन 380 भा. दं. वि.
ii) धारावी पोलीस ठाणे G.R.Cr. 10/24 कलाम 380 भा. दं. वि
iii) शाहुनगर पोलीस ठाणे गु. आर.कृ. 06/24 कलाम 380 भा. दं. वि
iv) डोंगरी पोलीस स्टेशन G.R.No. 12/24 कलम 380 IPC. दं. वि.
V) चमनगंज पोलीस ठाणे, कानपूर, उत्तर प्रदेश G.R.C. कलाम 380 भा. दं. वि
यांची कौतुकास्पद कामगिरी…
ही कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त, देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), मुंबई, लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशीकुमार मीना, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१), राज तिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त (मध्य), दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष ५ चे प्र.पो.नि. घनश्याम नायर, स.पो.नि. अमोल माळी, स.पो.उ.नि. अंकुश न्यायनिर्गुणे, हवालदार नितेश विचारे, तानाजी पाटील, सरफरोज मुलाणी, युवराज सावंत, प्रमोद पाटील, हरेश कांबळे व अंमलदार शुभम सांवत यांनी केली.