Site icon police varta

The three who broke into the house and beat up the old man and robbed him of lakhs of rupees


घरात घुसून वयोवृद्धेला मारहाण करून लाखोंचा ऐवज लुटणारे तिघे गजाआड
४ तासांत कांदिवली पोलिसांकडून गुन्ह्याची उकल

मुंबई : मलबार हिल, जुहू पाठोपाठ कांदिवलीत ६४ वर्षीय वयोवृद्धेला घरात घुसून मारहाण करत लाखोंचा ऐवज लुटणाऱ्या तिघांना गजाआड करण्यात आले. ही कौतुकास्पद कारवाई कांदिवली पोलिसांनी अवघ्या ४ तासांत केली. या कारवाईत १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अँटनी अल्लूया रोचा या मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील राहत्या घरात असताना भर दुपारी तीन जण तोंडाला रुमाल बांधून आत शिरले. त्यांनी अँटनी यांना मारहाण केली आणि त्यांच्या गळयातील सोन्याची चेन, हातातील कडे व मोबाईल फोन असा एकुण १ लाख १२ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल हिसकावून पळ काढला.
या घटनेची माहिती मुंबई पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षाकडुन प्राप्त होताच गुन्हे प्रकटीकरणचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दिपक पाटील व पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून आरोपी संतोष रामचंद्र घाटकर (४५, रा. कांदिवली पुर्व मुंबई), अनिल रामचंद्र घाटकर (४७), ओमप्रकाश पलगधारी भारती (३८) यांच्या मुसक्या आवळल्या.
या प्रकरणी या प्रकरणी अज्ञातांविरुद्ध (गु.र. क्र. २०१/२०२४ कलम ३९४, ४५२, ५०४,५०६ (२), ३४ भा.दं.वि) गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीदरम्यान आरोपींकडून चोरलेले हातातील सोन्याचे कडे, चेन, मोबाईल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस सह आयुक्त (का व सु) सत्यनारायण चौधरी, उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त राजीव जैन, परिमंडळ ११ चे उपायुक्त आनंद भोईटे, एसीपी शैलेंद्र धिवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोहन कदम, पीएसआय दीपक पाटील, सखाराम काळे, हवालदार जायभाये, बाबासाहेब काळे, अंमलदार नवलू, प्रविण वैराळ, गवळी, मोरे, राणे यांनी केली.

Exit mobile version