police varata

The thief who stole the mobile phones of 8 passengers was arrested in Kalyan station

कल्याण स्थानकात ८ प्रवाशांचे मोबाईल चोरणारा अटकेत
गुन्हे शाखा युनिट ३ची कौतुकास्पद कारवाई

कल्याण : मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक गर्दीचे असलेल्या कल्याण स्थानक ८ प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात आली. ही कारवाई मुंबई लोहमार्ग गुन्हे शाखा युनिट ३ च्या (Mumbai Railway Crime Branch) पथकाने केली.

असे उघडकीस आले गुन्हे

कल्याणच्या फलाट क्रमांक १ वर लोकलच्या जनरल डब्यात चढत असताना एका प्रवाशाच्या खिशातील मोबाईल चोराने पळवला. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू असताना ज्या दिवशी मोबाईल चोरीला गेल्या त्यावेळेस एक जण रेल्वे स्थानकामध्ये संशयास्पदरित्या फिरताना दिसून आला. त्यानुसार तपास केला त्याचे नाव सलमान मोहम्मद अली अन्सारी (वय 21 वर्षे, रा. भिवंडी, जि.ठाणे) असून तो सध्या आधारवाडी कारागृहात (Aadhaarwadi Jail) न्यायालयीन कोठडीत असल्याचे समजले. त्या माहितीच्या आधारे त्याला ताब्यात घेण्यात आले. ससमानला न्यायालयात हजर करून रिमांड मिळवण्यात आला. चौकशीदरम्यान त्याने आतापर्यंत केलेल्या गुन्ह्यांची माहिती दिली.      त्याच्याकडून  1 लाख 77 हजार 989 रुपयांचे महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात आले.

या गुन्ह्यांची उकल

१) कल्याण रेल्वे पोलीस गु.र.न. 116/2024 कलम 379, 34 भा.दं. वि.
२) कल्याण रेल्वे पोलीस गु.र.न. १११/२०२४ कलम ३७९ भा.दं. वि.
3) कल्याण रेल्वे पोलीस गु.र.नं. 356/2024 कलम 379, 34 भा.दं.वि.
४) कल्याण रेल्वे पोलीस गु.र.न. १४७/२०२४ कलम ३७९, ३४ भा.दं. वि.
५) कल्याण रेल्वे पोलीस गु.र.न. ४०३/२०२४ कलम ३७९, ३४ भा.दं. वि.
६) कल्याण रेल्वे पोलीस गु.र.न. ४०४/२०२४ कलम ३७९, ३४ भा.दं.वि.
७) कल्याण रेल्वे पोलीस गु.र.न. ४०६/२०२४ कलम ३७९, ३४ भा.दं. वि.
8) कल्याण गु.र.नं. ४०७/२०२४ कलम ३७९, ३४ भा.दं.वि.

यांनी केली कारवाई

अशा प्रकारे लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, मध्य लोहमार्ग परिमंडळचे उपायुक्त मनोज पाटील, एसीपी राजेंद्र रानमाळे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शन पोउपनिर प्रकाश चौगुले, अंमलदार राजेंद्र दिवटे, जनार्दन पुलेकर, अजय रौंधळ, रविंद्र दरेकर, वैभव जाधव, सौ.स्मीता बसावे, पद्मा केंजळे, महेंद्र कर्डिले, रविंद्र ठाकुर, हितेश नाईक, अजित माने, सोनाली पाटील, गोरख सुरवसे, अक्षय चव्हाण, सुनिल मागाडे यांनी कारवाई करून चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आणले.

आम्ही सर्तक, तुम्हीही दक्ष रहा

सर्वच स्थानकांसह मोक्याच्या विशेष रेल्वेस्थानकांमध्ये लोहमार्ग पोलिसांचा दिवसरात्र चोख बंदोबस्त असतो. मात्र सुजान नागरिक म्हणून प्रवासामध्ये प्रत्येकाने दक्ष राहिले पाहिजे. आपल्या आजूबाजूल कोणी संशायस्प व्यक्ती अथवा वस्तू दिसल्यास त्वरित १५१२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन या गुन्ह्याच्या निमित्ताने लोहमार्गचे आयुक्त आयपीएस डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!