police varata

The person carrying the pistol was arrested by the Mumbai Crime Branch


पिस्तूल, काडतूस बाळगणाऱ्याला अटक
पोलीस हवालदार गायकवाड यांची उत्तम कामगिरी


मुंबई : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वजताच मुंबई पोलीस दलही सतर्क झाले आहे. याच पार्श्वभूमीवर गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ६ च्या पथकाने पिस्तूल, २ जिवंत काडतूस बाळगणाऱ्याला अटक केली. ही कारवाई हवालदार गायकवाड यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे घाटकोपर परिसरातील राजावाडी रुग्णालयासमोर करण्यात आली. या कारवाईदरम्यान पिस्तूल, दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आली.
आगामी निवडणुकांसाठी सर्वांनी सतर्क राहावे, कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागू देऊ नका, अशा सूचना मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सर्व पोलिस विभागांना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने युनिट ६ चे पथक गैरकृत्य करणारे, अवैध धंद्यांवर लक्ष ठेवून असताना हवालदार गायकवाड यांना पिस्तूल बाळगणाऱ्याची माहिती प्राप्त झाली. त्या माहितीच्या आधारे प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद्र साळुंखे, ननावरे, पोउपनि रहाणे, महिला पीएसआय माशेरे, हवालदार गायकवाड, अंमलदार कोळेकर, इंगळे, पवार, कदम यांनी राजावाडी रुग्णालय येथे सापळा लावून एका व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला खोचलेले पिस्तूल आढळले. तसेच पॅन्टच्या खिशात दोन जिवंत आढळल्या.

या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात (गुरक्र. 26/2024 कलम 3, 25 भाहका सह कलम 37(1)(अ), 135 मपोका) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीने पिस्तूल कोठून आणले? कोणाला देणार होता? याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक माशेरे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!