मुंबईत पत्नीचा खून
आरोपीला यूपीत गुन्हे शाखा ७ च्या पथकाने ठोकल्या बेड्या
मुंबई : पत्नीचा गळा घोटणाºया पतीला यूपीत गजाआड करण्यात आले. ही कारवाई मुंबई गुन्हे शाखा कक्ष ७ च्या पथकाने केली. अवघ्या २४ तास गुन्हा उघडकीस आणल्याने वरिष्ठांनी तपासी पथकाचे कौतुक केले.
खुनाचा घटनाक्रम
कांजूरमार्ग पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये आरोपी नामे राजेश यादव याने कोणत्या तरी अज्ञात कारणावरून स्वत:च्या पत्नीची हत्या केली. मृतदेहाचे कापडी पट्टीने हातपाय बांधून बेडशिटमध्ये गुंडाळून मृतदेह घरामध्ये ठेवला आणि पळून गेला. सदर बाबत कांजूरमार्ग पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. १९/२४, कलम ३०२ भा. दं. वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास कांजूर मार्ग पोलिसांसह मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-७ चे पथकही करू लागले. वेगवेगळी पोलीस पथके तयार करून घटनास्थळावरील तसेच परीसरातील तपास सुरू असताना गुन्हा घडल्यापासून मयत महिलेचा पती फरार असल्याचे दिसून आले. पाहिजे आरोपी हा त्याचे मुळ गावी पळून जाण्याची शक्यता असल्याने ०१ पथक गाझिपूर, उत्तरप्रदेश येथे तात्काळ रवाना केले. मात्र आरोपी त्याच्या मूळगावी जाण्याऐवजी गाझिपूर असल्याचे तांत्रिक तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार उत्तर प्रदेशात गेलेल्या पथकाने तेथे जाऊ न आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, मा. विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शशी कुमार मिना, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१), राज तिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त (डी पूर्व), चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत, महिला पोलीस निरीक्षक राजश्री बाळगी, पोलीस निरीक्षक निरज उबाळे, पोउनि रामदास कदम, महेश शेलार, स्वप्नील काळे, नामदेव परबळकर, निधी धुमाळ, स्नेहा नाईक, अरुण सावंत, तानाजी उबाळे, दीपक पवार, हवालदार संतोष गुरव, राजेंद्र शिंदे, सुभाष मोरे, शशीकांत कांबळे, गिरीष जोशी, अजय बल्लाळ, विनोद शिरापुरी, सचिन गलांडे, प्रमोद जाधव, सीमा तिरोडकर, विलास राऊत, लुकमान सय्यद, विकास होनमाने, महेश सावंत, हिना शेख, सावित्री जाधव, संतोष धुमाळ, राजाराम कदम, दिलीप राठोड यांनी केली आहे.