police varata

Thanks to the Kalyan traffic police, the motorcycle stolen from Mumbai was recovered

कल्याण वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुंबईतून चोरीला गेलेली मोटारसायकल मिळाली परत

टोनिंग व्हॅनवर कर्तव्यावर असलेले पोलीस नाईक मिलिंदसिंग राजपूत यांना एक टीव्हीएस कंपनीची मोटरसायकल संशयास्पद आढळून आली. सदर मोटर सायकलचे हॅण्डल लॉक तुटलेले होते. त्यामुळे ही दुचाकी चोरल्याचा संशय आला. त्यामुळे राजपूत व हवालदार गोपाळे यांनी मोटारसायकलचे इंजिन नंबर, चेसिस नंबरवरून मालकाची माहिती मिळवली. त्यांच्याशी मोबाईल संपर्क साधला असता त्यांची मोटरसायकल ४ महिन्यांपूर्वी मुंबईतील अंधेरी येथून चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. ही माहिती त्वरित कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांना सांगून अंधेरी पोलिसांना मोटारसायकलची माहिती देण्यात आली.


अशा प्रकारे कल्याण वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीला गेलेली मोटारसायकल मालकाला परत मिळाली. या कामगिरीबद्दल वरिष्ठांनी मिलिंदसिंग राजपूत आणि गोपाळ यांचे कौतुक करून पुढील कर्तव्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!