Site icon police varta

Thane Railway Police | Bhopal Mobile Chor |ठाणे रेल्वे पोलिसांनी भोपाळच्या मोबाईल चोर टोळीला ठोकल्या बेड्या

30 Mobiles Recovered| चार लाखांचे 30 मोबाईल जप्त

ठाणे : Thane Railway Police | ठाणे रेल्वे पोलिसांनी प्रवाशांचे मोबाईल हिसकावून नेणाऱ्या भोपाळच्या टोळीला बेड्या ठोकल्या. | Bhopal Mobile Chor Gang | ही गॅंग हाती लागल्यामुळे अनेक गुन्हे उघडकीस येणार आहेत. कारवाईदरम्यान पोलिसांनी 30 मोबाईल जप्त केले आहेत. यांची एकूण किंमत चार लाख 6 हजार 859 एवढी आहे.


Mumbai Train Mobile Theft | असे उघडकीस आले प्रकरण

२५ जानेवारी २०२४ रोजी महाराजा एक्सप्रेसमधील एका प्रवाशाचा मोबाईल चोरीला गेला होता. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात (Mumbai Train Mobile Theft) ( गुन्हा क्र. ३३१/२०२४ कलम ३७९) गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेनंतर वारंवार प्रवाशांचे मोबाईल चोरीला जाण्याचे गुन्हे घडत होते. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर यांनी आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार मध्य लोहमार्ग विभागाचे पोलीस उपायुक्त
प्रज्ञा जेडगे, एसीपी राजेंद्र रानमाळे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर पोलीस उपनिरीक्षक रोहित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे गुन्हे शाखा युनिट दोनचे (Railway Crime Mumbai Police)
पथक आरोपींचा शोध घेऊ लागले. तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू असताना पोलिसांना आरोपींची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्व परिसरात सापाला लावला. आरोपी ते येताच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.


पकडलेले आरोपी
शंकर लक्ष्मण शाह (३३)
अजयकुमार रामेश्वर शाह (२८)
अजयनंदन अमरसिंह शाह (२४)
हे तिन्ही आरोपी मूळचे भोपाळ (मध्य प्रदेश) येथील रहिवासी आहेत.

पोलिसांची अचूक कारवाई
हे उल्लेखनीय कारवाई पोलीस उपनिरीक्षक अशोक ६ होळकर, पोलीस उपनिरीक्षक गजानन शेडगे, एएसआय महेश सावे, हवालदार अमित बडगेकर, अनिल खाडे, इमरान शेख, हरिष संदानशिव, गणेश महागावकर, सुनिल मागाडे, सोनाली पाटील, संकर तडवी, सत्यजित कांबळे व स्वप्नील नांगेरे यांनी केली.

Railway Crime Mumbai नागरिकांना आवाहन
रेल्वे प्रवाशांनी मोबाईल व मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात, गर्दीत सतर्क राहावे आणि संशयास्पद हालचाली दिसताच त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर यांनी नागरिकांना केले आहे.

Exit mobile version