police varata

Thane Crime Branch seizes drug stock worth Rs 11 lakh, two arrested in Mumbra, Daighar

ठाणे गुन्हे शाखेने जप्त केला ११ लाख रुपयांचा ड्रग्जचा साठा मुंब्रा, डायघरमध्ये दोघांना अटक

भीमराव काळे
ठाणे : शहराच्या गुन्हे शाखेने आपल्या तडाखेबाज कामगिरीने अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला नवा आयाम दिला आहे. अवघ्या दोन दिवसांत तब्बल ११ लाख रुपयांच्या अंमली पदार्थ आणि बेकायदेशीर औषधसाठ्याचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मुंब्रा येथे एम.डी. पावडर जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मुंब्रा येथील खडीगावजवळ मोहम्मद अब्दुल रेहमान सय्यद ऊर्फ नॉडी (रा. खोणीगाव) याच्या ताब्यात असलेला ७ लाख ४३ हजार २२० रुपयांचा ६०.३ ग्रॅम ‘एम.डी. Mephedrone’ अंमली पदार्थ जप्त केला. आरोपीविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला १६ डिसेंबर २०२४ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आरोपीकडे अधिक साठा आहे का, याचा तपास सुरू आहे.

डायघरमध्ये कफ सिरपचा साठा जप्त

डायघर येथील गणेश खिंड परिसरात नवाज शमशद्दीन पावले (रा. मुंब्रा) याच्या ताब्यात ३ लाख ६३ हजार रुपयांच्या ७२० बॉटल्स कोडीनयुक्त कफ सिरप जप्त करण्यात आले. या बेकायदेशीर साठ्यावर औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यासह एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची पोलिस कोठडी १७ डिसेंबर २०२४ पर्यंत मंजूर असून, या साठ्याचा स्त्रोत शोधण्याचा तपास चालू आहे.

विशेष कामगिरीचे श्रेय तपास पथकाला

ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), धनाजी क्षिरसागर, सहाय्यक पोलीस आयुक्त, (प्रतिबंध) गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के, सपोनि निलेश मोरे, सपोनि जगदीश गावित, पोउपनि दिपेश किणी, पोउपनि नितीन भोसले, पोउपनि राजेंद्र निकम, हवालदार५७२९ हरिश तावडे, अमोल देसाई, अभिजित मोरे, विक्रांत पालांडे, हेमंत महाले, महेश साबळे, संदीप भांगरे, प्रशांत राणे, शिल्पा कसबे, पोलीस नाईक अनुप राक्षे यांनी केली आहे.

नागरिकांना आवाहन

ठाणे गुन्हे शाखेच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे अंमली पदार्थ आणि बेकायदेशीर औषधांचा काळाबाजार उघडकीस आला आहे. यामुळे ठाणे पोलीस प्रशासनाने गुन्हेगारीत गुंतलेल्या असामाजिक तत्वांना कडक इशारा दिला आहे. या कारवाईने ठाणे शहरातील नागरिकांमध्ये पोलीस दलाविषयी विश्वास आणि समाधान वाढले आहे.

अंमली पदार्थ आणि बेकायदेशीर औषधांवर प्रतिबंध हाच ठाणे पोलीस दलाचा ध्येय आहे,” असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!