police varata

मुंबई, ठाणे, लोणावळा, गोवा येथे विदेशी मुलींकडून वेश्याव्यवसाय करवून घेणारी थायलंडची महिला जेरबंद । Thai woman jailed for procuring prostitution from foreign girls in Mumbai, Thane, Lonavala, Goa


वपोनि चेतना चौधरी यांच्यामुळे गुन्ह्याची उकल
दोन विदेशी मुलींची सुटका

ठाणे : उल्हासनगरात थायलंडच्या मुलींकडून सुरू असलेल्या वेश्याव्यसायाचा पर्दाफाश केल्यानंतर ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने अशा प्रकारचा गुन्हा उघडकीस आणला. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली. या कारवाईत थायलंडच्या २ मुलींची सुटका करण्यात आली.

ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे पथक गैरकृत्यावर लक्ष ठेवून असताना शहर परिसरात, मुंबई, लेणावळा, गोवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी काही महिन्यांपासून विदेशी महिला दलाल या विदेशी मुली व महिलांना फुस लावुन वेश्यागमनासाठी पाठवितात. त्या माहितीच्या आधारे ८ ऑक्टोबर रोजी ‘हॉटेल ला डहलिया, आर मॉल समोर, वरुण आर्केडच्या बाजुला, जी.बी. रोड, चितळसर मानपाडा, ठाणे पश्चिम’ या ठिकाणी बोगस ग्राहक पाठवुन पोलिसांनी धाड टाकली. त्यावेळी १ विदेशी थायलंड दलाल महिला वय ३८ वर्ष) ही दोन विदेशी महिलांना फुस लावुन त्यांच्याकडून वेश्यागमन करून घेताना मिळाली. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. । ८४४/२०२४ भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम १४३(१), १४३ (३) सह अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम सन १९५६ चे कलम ४ व ५ प्रमाणे खा दाखल करून थायलंडच्या दलाल महिलेला अटक करण्यात आली. कारवाईदरम्यान दोन विदेशी बळीत महिलांची सुटका करण्यात आली.


ही कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) शिवराज पाटील, एसीपी धनाजी क्षीरसागर, अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउपनिरी श्रध्दा कदम, डी. के. बालगुडे, हवालदार के. बी. पाटील, अंमलदार व्ही. बी. यादव, गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या सपोउपनिरी आशा कांबळे, हवालदार पी. एस. राणे, आशा मोरे, पोलीस नाईक डी. एस. सवंत, अंमलदार संगीता प्रधान, सुहास खंदारे, यू.एम. घाडगे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!