मुंबई, ठाणे जिल्ह्यात चोऱ्या करणाऱ्या तामिळनाडूच्या टोळीचा पर्दाफाश
१२ गुन्ह्यांची उकल करण्यात कल्याण रेल्वे गुन्हे शाखेला यश
मुंबई : मुंबई शहर व रेल्वे मार्गावरील कल्याण, डोंबिवली व ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोऱ्या करणाऱ्या तामिळनाडूच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ही टोळी कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या हाती लागल्याने १२ गुन्ह्यांची उकल झाली आहे. या कारवाईदरम्यान ११ मोबाईल व लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.
आंतरराज्यातील गुन्हेगार टोळी रेल्वे हद्दीत गुन्हे करण्यासाठी आली असून ती बदलापूर-डोंबिवली-टिटवाळा स्थानकांदरम्यान रेल्वे मेल/लोकलमध्ये चोऱ्या करीत असल्याची माहिती रेल्वे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशुद्दीन शेख व डोंबीवली रेल्वे पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांना माहिती प्राप्त झाली. त्याअनुषंगाने वपोनि अरशुद्दीन शेख यांनी सदर टोळीचा शोध घेण्यासाठी कल्याण युनिटला सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे शाखा, कल्याण युनिटमधील अधिकारी अंमलदार गस्त करुन तसेच खबरीच्या मदतीने टोळीचा शोध घेत असतांना, दिनांक 01/05/2024 रोजी, खास बातमीदाराने चार इसम संशयास्पद स्थितीत कल्याण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्र. १ वर असल्याची खात्रीशिर खबर दिली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सत्यराज ओथुरगा (वय 26 वर्षे), कृष्णा गणेश (27 वर्षे), शक्तीवेल अवालुडन (वय 27 वर्षे), गणेश सेल्वम (वय 24 वर्षे, सर्व राह वेल्लुर, तामिळनाडू) यांना शिताफिने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला. हा कल्याण रेल्वे पोलीस ठाणे गु.र.नं. 800/2024 कलम 379 भा.दं. वि. मधील असल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्या त्यांच्याकडून 2 लाख ७ हजार ९८९ रुपयांचे मोबाईल फोन, लॅपटॉप हस्तगत करण्यात आले.
या गुन्ह्यांची उकल
हा मुद्देमाल कल्याण रेल्वे पोलीस (गु.र.न. ८००/२०२४ कलम ३७९, ३४ भा.दं. वि. सह कलम १४७ भा.रे.का.), कल्याण रेल्वे पोलीस (गु.र.न. 801/2024 कलम 379, 34 भा.दं. वि. ३) डोंबीवली रेल्वे पोलीस अधिकारीगु.र.नंद. ८५/२०२४ कलम ३७९, ३४ भा.दं. वि.), डोंबीवली रेल्वे पोलीस ठाणे (गु.र.नं. 86/2024 कलम 379, 34 भा.दं.वि.), डॉबीवली रेल्वे पोलीस अधिकारी (गु.र.नं. ८९/२०२४ कलम ३७९, ३४ भा.दं.वि.), कल्याण रेल्वे पोलीस (गु.र.न. ८१९/२०२४ कलम ३७९, ३४ भा.दं. वि.), कल्याण रेल्वे पोलीस (गु.र.न. ८१८/२०२४ कलम ३७९, ३४ भा.दं.वि.) कल्याण रेल्वे पोलीस अधिकारी, र.न. 808/2024 कलम 379, 34 भा.दं. वि.), कल्याण पोलीस अधिकारी (गु.र.नं. ८२१/२०२४ कलम ३७९, ३४ भा.दं. वि.), कल्याण रेल्वे पोलीस अधिकारी (गु.र.नं. ८२२/२०२४ कलम ३७९, ३४ भा.दं. वि.), डोंबीवली रेल्वे पोलीस ठाणे (गु.र.नं. 90/2024 कलम 379, 34 भा.दं.वि.), वांद्रे शहर पोलीस (गु.र.न. ६६८/२०२४ कलम ३७९ भा.दं. वि.) या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांतील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस आयुक्त, मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, मध्य परिमंडळ राजेंद्र रानमाळे, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अरशुद्दीन शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक रोहित सावंत, किरण उंदरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डोंबीवली रेल्वे पोलीस ठाणे यांचे नेतृत्वाखाली गुन्हे शाखा, कल्याण युनिट येथील पो. उपनिरीक्षक, प्रकाश चौगुले, पोलीस अंमलदार राजेंद्र दिवटे, अजय सैंधळ, रविंद्र दरेकर, वैभव जाधव, स्मिता वसावे, पद्मा केंजळे, महेंद्र कर्डिले, रविंद्र ठाकुर, सोनाली पाटील, हितेश नाईक, अजित माने गोरख सुरवसे, अक्षय चव्हाण, सुनिल मागाडे तसेच डोंबीवली रेल्वे पोलीस ठाणेचे पोउपनिरी संजय नस्टे, सपोउपनि सुधीर चौधरी, पोलीस अंमलदार भांडारकर, पाटील, तांत्रिक शाखेचे सपोनि मंगेश खाडे, अंमलदार अहिनवे यांनी केली आहे.
कौतुकास्पद कामगिरी